उत्कर्ष पतसंस्थेच्या सभासदांना १० टक्के लाभांश

वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात- ज्येष्ठ नागरिकांचा विशेष सत्कार
Dividend to members, utkarsh credit society, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
वाई - उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वाईच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी सभासदांना १० टक्के लाभांश देण्याची घोषणा करण्यात आली. संस्थेच्या वतीने यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा विशेष सत्कार करून त्यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात आला.

संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दि. २६ सप्टेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभासदांचा संस्थेवरील विश्वास, ठेवीदारांचे सहकार्य आणि संचालक मंडळाच्या मार्गदर्शनामुळे संस्थेने सातत्याने प्रगती साधली असून, सहकार क्षेत्रात विश्वासार्ह संस्था म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

कै. आनंद (अण्णा) कोल्हापुरे यांनी सर्वसामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने सन १९९९ मध्ये उत्कर्ष पतसंस्थेची स्थापना केली. सहकार, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाचा त्यांनी घालून दिलेला वारसा जपत संस्था आजही सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी कार्यरत आहे. 

अध्यक्षा अनुराधा आनंद कोल्हापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने बदलत्या काळानुसार आधुनिक डिजिटल बँकिंग सुविधांसह विविध ठेव योजना, सोनेतारण कर्ज, गृहकर्ज, वाहनकर्ज, व्यवसाय कर्ज आणि विमा सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. सभासदांना सुलभ, सुरक्षित आणि तत्पर आर्थिक सेवा देण्यावर संस्थेचा भर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

वार्षिक सभेच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांचा विशेष सत्कार करण्यात आला. समाजाच्या जडणघडणीत ज्येष्ठ नागरिकांनी दिलेले योगदान, त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि संस्कार यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद व मार्गदर्शन ही संस्थेची अनमोल संपत्ती असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

अध्यक्षा अनुराधा आनंद कोल्हापुरे यांनी सभासदांचे अभिनंदन करताना संस्थेच्या प्रगतीमध्ये प्रत्येक सभासदाचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. सभासदांचे आर्थिक हित जोपासणे, आधुनिक आर्थिक सेवा उपलब्ध करून देणे आणि सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक उन्नतीला चालना देणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी उपाध्यक्ष ॲड. रमेश रामचंद्र यादव तसेच संचालक अमर आनंद कोल्हापुरे, मदन कृष्णाजी साळवेकर, डॉ. मंगला प्रकाश अहिवळे, श्रीकांत सुनील शिंदे, शरद रामचंद्र चव्हाण, नीला मधुकर कुलकर्णी, सलीम सोनु बागवान, संजय लक्ष्मण वाईकर, सागर विलास मुळे, वैभव सुरेश फुले, भूषण सुधाकर तारु आणि अलका मदन घाडग यांची उपस्थिती होती.

तसेच रामचंद्र लोखंडे, बाळासाहेब वाघ, डॉ. शिंदे, कुलकर्णी काका, रसाळ, धर्मराज भोसले, शिवाजीराव निंबाळकर, रमेश गुरव, डॉ. मकरंद पोरे, अविनाश निंबाळकर, राजेंद्र चौधरी, धोमकर सर, प्रभाकर गाडे, बाळकृष्ण वाघ यांच्यासह अनेक मान्यवर सभासद उपस्थित होते.

सभासदांच्या सक्रिय सहभागामुळे वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. संस्थेच्या प्रगतीबद्दल उपस्थित सभासदांनी समाधान व्यक्त केले. सभासदांचा विश्वास, पारदर्शक कारभार आणि सेवाभावाच्या बळावर उत्कर्ष पतसंस्थेची प्रगतीची वाटचाल यापुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

संस्थेच्या वतीने सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यात आले.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !