संस्कृती व समाजप्रबोधनाचे देखावे साकारणाऱ्या स्थानिक कलाकारांच्या कलेची दखल
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)वाई - गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक, ऐतिहासिक व सामाजिक विचारांचे प्रबोधन करणाऱ्या वाई शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांतील कलाकारांचा 'वाई बिझनेस प्रो' (WAI BUSINESS PRO) च्या वतीने “कलागौरव प्रमाणपत्र” देऊन विशेष गौरव करण्यात आला. स्थानिक कलाकारांच्या मेहनतीला प्रोत्साहन मिळावे आणि कला-संस्कृती अधिक व्यापक स्तरावर पोहोचावी, या उद्देशाने संस्थापक विठ्ठल जिद्दीमनी यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत वाई शहरातील प्रमुख चार गणेशोत्सव मंडळांतील कलाकारांचा गौरव करण्यात आला.
आझाद तालीम गणेशोत्सव मंडळ (सोनगीरवाडी):
सुमारे ७३ वर्षांची उज्ज्वल परंपरा कायम राखत मंडळाने यंदा पौराणिक जिवंत देखावा सादर केला होता. धार्मिक व सांस्कृतिक वारशाचे प्रभावी दर्शन घडविणाऱ्या येथील कलाकारांचा 'कलागौरव' पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
भोईराज गणेश उत्सव मंडळ (रविवार पेठ):
गंगापुरी युवक मंडळ (गंगापुरी):
महान स्वातंत्र्यसेनानी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या जीवनप्रवासावर आधारित संघर्ष, त्याग आणि देशप्रेमाचा संदेश देणारा जिवंत देखावा मंडळाने सादर केला होता. यातील कलाकारांच्या अप्रतिम अभिनयाची दखल घेत त्यांना गौरविण्यात आले.
“संत तुकाराम महाराज अमरगाथा” या देखाव्यातून वारकरी परंपरा व संत तुकारामांचे विचार प्रभावीपणे मांडणाऱ्या बालकलाकारांसह सर्व कलाकारांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
न्यू गजानन मंडळ (गंगापुरी):
जिवंत ऐतिहासिक देखावा सादरीकरणाचे २० वे वर्ष साजरी करत मंडळाने “इतिहासातील एक न उलगडलेले पान – स्वराज्य धुरंधर ज्योत्याजी आणि रायाप्पा” हा भव्य देखावा सादर केला. गेल्या २ ते ३ महिन्यांपासून मेहनत घेणाऱ्या ४० हून अधिक कलाकारांना 'कलागौरव' देऊन गौरविण्यात आले.
स्थानिक कलाकारांचे हे योगदान कौतुकास्पद असून त्यांच्या पुढील सांस्कृतिक वाटचालीस 'वाई बिझनेस प्रो'चे संस्थापक विठ्ठल जिद्दीमनी तसेच टीमतर्फे हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा















