शैक्षणिक गुणवत्तावृद्धीसाठी शिक्षकांनी नव्या शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी - गटशिक्षणाधिकारी महेश गवळी यांचे मार्गदर्शन

शिंदेवाडी केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न
Council of Education, Shindewadi, malshiras, natepute, Solapur, shivshahi news,


शिवशाही वृत्तसेवा, माळशिरस (राहुल तनपुरे)
शिंदेवाडी - शैक्षणिक गुणवत्तावृद्धी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी अध्यापन पद्धती आणि विविध शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन यावर सखोल मार्गदर्शन करत केंद्र शिंदेवाडीची शिक्षण परिषद मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिंदेवस्ती नं. २ येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

दुपारी २ ते ५ या वेळेत झालेल्या या परिषदेस केंद्रातील सर्व शिक्षकांसह हनुमान विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, शिंदेवाडीच्या प्रभारी मुख्याध्यापिका मिताली देठे व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात काकडे यांच्या स्वागत व प्रास्ताविकाने झाली. शहाणे यांनी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा तसेच मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान करण्याबाबतचे नियोजन स्पष्ट केले. इनामदार यांनी नमुना पाठाचे प्रभावी सादरीकरण करून अध्यापनातील विविध उपक्रमांची माहिती दिली.

डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमांतर्गत पोटरे व इर्शाद मुलानी यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अध्ययन प्रक्रियेत सहभागी करून घेणे, स्वाध्याय घेणे तसेच कृतीआधारित अध्ययन प्रभावीपणे राबविणे याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.

गटशिक्षणाधिकारी महेश गवळी यांनी शिक्षकांना शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीवर लक्ष केंद्रित करून नाविन्यपूर्ण व विद्यार्थी-केंद्रित अध्यापन पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन केले.

अजय साळवे यांनी HPC बाबत मार्गदर्शन केले. इर्शाद मुलानी यांनी स्कॉलरशिप अभ्यासक्रमाची दिशा, अभ्यासाचे नियोजन व विद्यार्थ्यांच्या तयारीबाबत मार्गदर्शन केले. अशोक ओहाळ यांनी आनापान साधनेचे महत्त्व व त्याचा विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेसाठी होणारा उपयोग याविषयी माहिती दिली.
केंद्रप्रमुख भरते यांनी केंद्रातील शाळांच्या कामकाजासंदर्भात विविध प्रशासकीय सूचना देऊन आगामी शैक्षणिक नियोजनाची दिशा स्पष्ट केली.

यावेळी शिंदेवाडी शाळेचे मुख्याध्यापक अशोक रुपनवर, काझी व शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप माळवे यांच्या आभारप्रदर्शनाने झाला.

ही शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवस्ती नं. २ चे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच शाळा व्यवस्थापन समितीने विशेष परिश्रम घेतले. यावेळी नवनाथ रणदिवे यांचा वतीने गटशिक्षणाधिकारी सरांचा यथोचित सन्मान करण्यात आला‌ शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे परिषदेला शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध आणि प्रेरणादायी वातावरण लाभले.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !