भक्तीला पर्यावरणाची साथ - धोम कॉलनीत घरच्या अंगणात बाप्पाचे विसर्जन

गणेश विसर्जनासाठी ठिकठिकाणी कृत्रिम कुंडांची व्यवस्था
Artificial tank for Ganesh immersion, ganeshotsav, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
वाई - ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करत बाप्पाला निरोप देताना डोळ्यांत पाणी येते; मात्र त्याच वेळी आपल्या लाडक्या गणरायामुळे निसर्गाला त्रास होऊ नये, याची काळजी घेणारी भक्तीही तितकीच महत्त्वाची आहे. भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा असाच सुंदर संगम वाई शहरातील धोम कॉलनी येथे पाहायला मिळाला.

वाई नगरपालिका शहरात गणेश विसर्जनासाठी ठिकठिकाणी कृत्रिम कुंडांची व्यवस्था करते आणि अनेक भाविक या कुंडांमध्ये विसर्जन करतात. मात्र, ‘निसर्ग हाच खरा देव’ आणि ‘बाप्पाची सेवा करताना पर्यावरणाचीही सेवा झाली पाहिजे’, ही भावना मनात ठेवून धोम कॉलनीतील सुनंदा जाधव यांनी गेल्या पाच वर्षांपासून घराच्या अंगणातच बाप्पाचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्याची स्तुत्य परंपरा जपली आहे.

यंदाही दहा दिवस मनोभावे गणरायाची पूजा-अर्चा केल्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी जाधव कुटुंबीयांनी अंगणातच बाप्पाची आरती केली. त्यानंतर शाडूच्या मातीच्या मूर्तीचे कुंडीत विधिवत विसर्जन करण्यात आले. मूर्ती विरघळल्यानंतर हे पाणी आणि माती परिसरातील झाडांना अर्पण केली जाणार आहे. यामुळे बाप्पाच्या रूपात आलेली माती पुन्हा निसर्गाच्या कुशीत मिसळणार आहे.

बाप्पाला निरोप देताना मोठा आवाज, गर्दी आणि जलप्रदूषणापेक्षा श्रद्धा, साधेपणा आणि निसर्गप्रेमाचा संदेश देणारी ही कृती अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. ‘मूर्ती मातीतून आली आणि पुन्हा मातीमध्येच विलीन झाली’, या भावनेतून जाधव कुटुंबीयांनी गणेशोत्सवाचा खरा अर्थ जपला आहे.

वाई नगरपालिका विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबवत असते. या पार्श्वभूमीवर यंदा घरच्या घरी किंवा पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशमूर्तीचे विसर्जन करणाऱ्या नागरिकांचा नगरपालिका प्रशासनाने गौरव करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी अशा कुटुंबांचा सत्कार करून त्यांच्या उपक्रमाला प्रोत्साहन द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

“गणपती बाप्पा आपल्या श्रद्धेचा विषय आहे; पण त्याचबरोबर निसर्गही आपलाच आहे. बाप्पाचे विसर्जन करताना पर्यावरणाची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे. आम्ही गेल्या पाच वर्षांपासून मातीची मूर्ती आणतो आणि घराच्या अंगणातील कुंडीतच तिचे विसर्जन करतो. त्या मातीचा व पाण्याचा उपयोग झाडांसाठी होतो. यामुळे बाप्पाची भक्तीही होते आणि निसर्गाचे रक्षणही!”
- सुनंदा जाधव, 
गृहिणी, धोम कॉलनी, वाई
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !