गावाला मिळणार दरवर्षी ५ कोटींचा निधी
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनेअंतर्गत येथील प्रसिद्ध श्री भैरवनाथ देवस्थानाला "ब" वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्रदान करण्यात आला असून, यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय राज्याच्या ग्रामविकास विभागाने दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी निर्गमित केला आहे.
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून जारी झालेल्या या शासन निर्णयानुसार सचिव (ग्रामविकास) यांच्या अध्यक्षतेखालील राज्य निकष समितीने दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या बैठकीत या प्रस्तावाची छाननी केली. देवस्थानाचा प्रस्ताव शासन निर्णयातील सर्व निकषांची पूर्तता करत असल्याचे निदर्शनास आल्याने, महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने हा दर्जा बहाल करण्यात आला.
या निर्णयामुळे यात्रेकरूंना अधिक सोयीसुविधा उपलब्ध होणार असून, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. तसेच धार्मिक पर्यटनाला बळ मिळून भैरवनाथाचे आध्यात्मिक व सांस्कृतिक महत्त्व अधिक वृद्धिंगत होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी दरवर्षी ग्रामपंचायतीला ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे.
राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या पुढाकाराने व मान्यतेने हा निर्णय झाल्याने स्थानिक नागरिक व भाविकांतून त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत. त्यामुळे बावधनच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे. बावधनच्या ग्रामस्थांमध्ये या निर्णयामुळे उत्साहाचे वातावरण असून, गावाच्या धार्मिक व आर्थिक विकासाला यामुळे नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



























