अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांच्या हस्ते पीबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पो मंडप उभारणीचा शुभारंभ

सातारा रनर्स फाउंडेशनच्या वतीने गेल्या १४ वर्षांपासून आयोजन

Satara Hill Half Marathon, punit balan, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

सातारा रनर्स फाउंडेशनच्या वतीने गेल्या १४ वर्षांपासून सातारा हिल हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी मॅरेथॉनचे १५ वे वर्ष असून, देशभरातून सुमारे १० हजार धावपटूंनी या मॅरेथॉनसाठी नोंदणी केली आहे.

यावर्षीचा ‘मॅरेथॉन एक्स्पो’ शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर आणि शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कै. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक संकुलात आयोजित करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोच्या मंडप उभारणीचा शुभारंभ सोमवार, दि.२४ ऑगस्ट रोजी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक  जिवाजी मोहिते यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून व भूमिपूजन करून करण्यात आला.

यावेळी पीबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन संयोजन समितीचे अध्यक्ष आर्किटेक्ट उपेंद्र पंडित, उपाध्यक्ष विशाल ढाणे आणि सेक्रेटरी शैलेश ढवळीकर यांनीही श्रीफळ वाढवून मंडप उभारणी कार्याचा शुभारंभ केला. याप्रसंगी सातारा रनर्स फाउंडेशनचे संचालक अभिषेक भंडारी तसेच अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे सांस्कृतिक विभाग प्रमुख तथा ज्येष्ठ पत्रकार  महेंद्र  जाधव उपस्थित होते.

यावर्षी देखील एक्स्पोसाठी ‘जर्मन हँगर’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भव्य मंडप उभारण्यात येत आहे. या मंडपाचे संकल्पनात्मक डिझाईन स्वतः संयोजन समितीचे अध्यक्ष तथा आर्किटेक्ट उपेंद्र पंडित यांनी केले असून, त्यासाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली आहे. मोठ्या संख्येने येणाऱ्या धावपटू आणि नागरिकांना प्रशस्त, सुरक्षित व आरामदायी वातावरण मिळावे याचा विशेष विचार या डिझाईनमध्ये करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा मंडप संपूर्ण वातानुकूलित असणार आहे. या मंडप उभारणीची जबाबदारी मंडप कॉन्ट्रॅक्टर  भाऊ भोसले व  जितेंद्र भोसले यांनी स्वीकारली आहे.

या एक्स्पोमध्ये देशभरातील विविध नामांकित संस्था व कंपन्या आपल्या उत्पादनांचे व सेवांचे स्टॉल्स उभारणार आहेत. यामध्ये स्पोर्ट्स, रनिंग, फिटनेस, आरोग्य, पोषण तसेच क्रीडा क्षेत्राशी संबंधित विविध उत्पादने व उपक्रमांची माहिती धावपटू आणि नागरिकांना मिळणार आहे. त्यामुळे धावपटूंसोबतच फिटनेस व आरोग्याची आवड असणाऱ्या नागरिकांसाठीही हा एक्स्पो विशेष आकर्षण ठरणार आहे.

मॅरेथॉनच्या दोन दिवस आधी होणारा हा एक्स्पो केवळ विविध स्टॉल्सचे प्रदर्शन नसून, रनिंग, फिटनेस, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रातील विविध उपक्रमांची माहिती देणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. देशभरातून साताऱ्यात दाखल होणाऱ्या धावपटूंमुळे एक्स्पोमध्ये मॅरेथॉनपूर्व उत्साहाचे वातावरण निर्माण होणार असून, सातारकर नागरिकांनाही या उत्साहाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

‘जर्मन हँगर’ तंत्रज्ञानामुळे उभारण्यात येणारा हा भव्य आणि संपूर्ण वातानुकूलित एक्स्पो मंडप सातारकरांसाठीही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. त्यामुळे सातारकर नागरिकांनी या भव्य एक्स्पोला आवर्जून भेट देऊन देशभरातून सहभागी होणाऱ्या धावपटूंच्या उत्साहाचा अनुभव घ्यावा, तसेच विविध स्टॉल्स, उत्पादने व उपक्रमांची माहिती घ्यावी, असे आवाहन रेस डायरेक्टर डॉ. अविनाश शिंदे, जॉईंट रेस डायरेक्टर डॉ दिपक बनकर, उपाध्यक्ष विशाल ढाणे, सेक्रेटरी शैलेश ढवळीकर आणि खजिनदार राहुल घायताडे यांनी संयुक्तपणे केले आहे

-----------------

Sudhakar pant paricharak, anniversary, shivshahi new, advertise,

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------


Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !