मोटारसायकलस्वार गंभीर जखमी, क्रुझर ओढ्यात कोसळली
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई–जांभळी मार्गावरील वडवली (ता. वाई) येथे शुक्रवारी झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण पश्चिम भाग हादरून गेला. क्रुझर आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत मोटारसायकलस्वार नवनाथ आनंदा सुतार (वय ३६, रा. वासोळे, ता. वाई) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वाई येथील घोटवडेकर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ११ एल ९७८३ क्रमांकाची क्रुझर वासोळेहून वाईच्या दिशेने येत होती. ही गाडी राजेंद्र हनुमंत चौधरी (वय ५०, रा. मेणवली, ता. वाई) चालवत होते. त्याचवेळी वाईहून वासोळ्याकडे जाणारी फॅशन प्रो (एमएच १२–६९३७) मोटारसायकल समोरून येत असताना दोन्ही वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली.
धडकेचा जोर इतका प्रचंड होता की क्रुझर रस्त्यालगतच्या ओढ्यात जाऊन कोसळली, तर मोटारसायकलचा अक्षरशः चक्काचूर झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेला आणि घटनास्थळी काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
गंभीर जखमी झालेल्या नवनाथ सुतार यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
या भीषण अपघातामुळे पश्चिम भागातील नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. विशेषतः वडाप वाहतुकीचा वापर करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून या मार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस हवालदार बिराजदार या अपघाताचा अधिक तपास करीत असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
-----------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



























