सुशांत बोंडले यांचे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या परीक्षेत अभूतपूर्व यश - असिस्टंट कमांडंट पदाला गवसणी

नायगाव तालुक्याचा बहूमान उंचावला

Success in the Central Armed Police Force exam,Nanded, Naigaon, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) घेण्यात आलेल्या Central Armed Police Forces (CAPF) परीक्षेत नायगाव  तालुक्यातील घुंगराळा येथील सुशांत सूर्यकांत बोंडले यांनी अभूतपूर्व यश संपादन केले आहे. देशातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या या परीक्षेत यश मिळवत त्यांनी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील असिस्टंट कमांडंट (Assistant Commandant) पदावर   क्लास एक  group A गवसणी घातली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे नायगाव शहरासह संपूर्ण तालुक्याचा मान उंचावला असून, विविध स्तरातून सुशांत बोंडले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सुशांत बोंडले यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासाची भक्कम सुरुवात इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत गोदावरी मनार पब्लिक स्कूल, शंकरनगर येथे केली. त्यानंतर सातवी ते दहावीपर्यंतचे माध्यमिक शिक्षण केम्ब्रिज विद्यालय, नांदेड येथे पूर्ण करत अभ्यासात विशेष प्रावीण्य मिळविले. उच्च माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी महाराष्ट्रातील नामांकित फर्ग्युसन कॉलेज, पुणे येथे अकरावी-बारावीचे शिक्षण घेतले.

त्यानंतर देशातील नामांकित IIIT श्री सिटी, चित्तूर, आंध्र प्रदेश येथून त्यांनी संगणक अभियांत्रिकीची बी.टेक. पदवी यशस्वीरीत्या संपादन केली. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर केंद्रीय सेवेत जाण्याचे ध्येय उराशी बाळगत त्यांनी दिल्ली येथे जाऊन यूपीएससी परीक्षेची कठोर तयारी सुरू केली.

ध्येय निश्चित करून अहोरात्र अभ्यास

यूपीएससीसारख्या अत्यंत खडतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीदरम्यान सुशांत यांनी सातत्य, कठोर परिश्रम आणि शिस्तबद्ध अभ्यासाच्या जोरावर आपल्या ध्येयाकडे वाटचाल केली. देशसेवेत योगदान देण्याचे स्वप्न मनाशी बाळगून त्यांनी दिवस-रात्र अभ्यास करत परीक्षेची तयारी केली. अखेर त्यांच्या मेहनतीला यश मिळाले आणि CAPF परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत असिस्टंट कमांडंट पदावर निवड झाली. 

प्रशासकीय सेवेचा वारसा आणि कुटुंबाचे संस्कार

सुशांत बोंडले हे नायगाव तालुक्यातील  घुंगराळा येथील ग्रामपंचायत अधिकारी तसेच संघटनेचे तालुका सरचिटणीस सूर्यकांत जळबा बोंडले यांचे सुपुत्र आहेत. वडिलांच्या प्रशासकीय सेवेतील अनुभव, मार्गदर्शन आणि कुटुंबातील संस्कारातून सुशांत यांना केंद्रीय सेवेत जाण्याची प्रेरणा मिळाली. लहानपणापासूनच त्यांनी मोठे ध्येय निश्चित करून त्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.

सुशांत बोंडले यांच्या या यशाने नायगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोरही प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य मार्गदर्शन आणि ध्येयाशी प्रामाणिक राहिल्यास स्पर्धा परीक्षेत यश मिळवता येते, हे त्यांनी आपल्या कामगिरीतून सिद्ध केले आहे.

त्यांच्या या यशाबद्दल नायगाव शहर व तालुक्यातील नागरिक, शिक्षक, मित्रपरिवार, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

         -----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

-----------------

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------


Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !