आमदार समाधान आवताडे, चंदाताई तिवाडी व मंगेश चिवटे यांच्या शुभहस्ते वितरण; पंढरपूर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव
पंढरपूर (विशेष प्रतिनिधी)
सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल येथील सामाजिक कार्यकर्ते तथा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डधारक विश्वविक्रमवीर कवी आणि लेखक रवि वसंत सोनार व सौ. सविता रवि सोनार या दांपत्याला 'राज्यस्तरीय शिवशाही महारत्न - आदर्श पती-पत्नी पुरस्कार २०२६' प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
'शिवशाही न्यूज नेटवर्क'च्या माध्यमातून आयोजित या विशेष सोहळ्यात पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार मा. समाधान दादा आवताडे, सुप्रसिद्ध भारूडकार मा. चंदाताई तिवाडी, मुख्यमंत्री आरोग्य कक्षाचे प्रमुख मा. मंगेश चिवटे, शिवशाही परिवाराचे मा. सचिन कुलकर्णी व सौ. मनिषा कुलकर्णी आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, पुस्तक संच, पुष्पगुच्छ आणि महावस्त्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
समाजासाठी प्रेरणादायी कार्य
सोनार दांपत्य हे समाजसेवा, शिक्षण, पर्यावरण, साहित्य, संस्कृती, कला, अध्यात्म, अभिनय आणि लघुपट निर्मिती अशा विविध क्षेत्रांत गेली अनेक वर्षे निरंतर कार्यरत आहे. त्यांनी मातोश्री वृद्धाश्रम, रामकृष्णहरी वृद्धाश्रम, नवरंगे बालकाश्रम, अंधशाळा तसेच 'पालवी' सामाजिक संस्थेला गरजेनुसार सातत्याने मदत केली आहे. निःस्वार्थ सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांनी समाजातील उपेक्षित व गरजवंत घटकांना आपल्या प्रत्येक आनंदात सहभागी करून घेतले आहे.
कौटुंबिक व सामाजिक मूल्यांचा आदर्श
आजच्या काळात कुटुंब व्यवस्था आणि नात्यांची वीण सैल होत असताना, सोनार दांपत्याने आपल्या २६ वर्षांच्या वैवाहिक जीवनात प्रेम, विश्वास आणि संवाद जपला आहे. एकमेकांना सामाजिक व शैक्षणिक कार्यात खंबीर साथ देत त्यांनी आपल्या लग्नाचा रौप्यमहोत्सव अत्यंत अनोख्या आणि सामाजिक उपक्रमांनी साजरा केला. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडतानाच समाजासमोर एक उत्तम आदर्श निर्माण केला आहे.
पंढरपूर परिसरातून कौतुकाचा वर्षाव
सोनार पती-पत्नीला हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल पंढरपूर व परिसरातील साहित्य, नाट्य, संगीत, कला, क्रीडा, अध्यात्म, पत्रकारिता, विधी, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून त्यांचे मनापासून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा


























