श्री. चंद्रकांत शिंदे-काका यांच्या निवडीमुळे शिंदेवाडी गावात आनंदाचे वातावरण
शिवशाही वृत्तसेवा,माळशिरस (प्रतिनिधी वैभव कुलकर्णी)
शिंदेवाडी गावच्या विकासासाठी माजी सरपंच म्हणून कार्यक्षम नेतृत्व केलेले, अनुभवी व्यक्तिमत्व चंद्रकांत नारायणराव शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या 'हनुमान विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, शिंदेवाडी' च्या स्कूल कमिटी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
चंद्रकांत शिंदे यांनी यापूर्वी शिंदेवाडी गावचे सरपंचपद यशस्वीरित्या भूषवले आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावच्या विकासकामांत त्यांनी दिलेले योगदान आणि त्यांचे सामाजिक कार्य सर्वश्रुत आहे. आता याच अनुभवाचा उपयोग ते शैक्षणिक क्षेत्रात करणार आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या ध्येयधोरणांना अनुसरून हनुमान विद्यालयाच्या सर्वांगीण विकासात आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरणार आहे.
श्री. चंद्रकांत शिंदे-काका यांच्या निवडीमुळे शिंदेवाडी गावात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या निवडीबद्दल शाळेचे शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांची ही नवी जबाबदारी यशस्वी ठरो, अशा शुभेच्छा सर्व स्तरांतून व्यक्त केल्या जात आहेत.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा


























