गोरक्षकांच्या सतर्कतेने बेकायदा कत्तलीचा पर्दाफाश - ६० किलो मांस जप्त

रविवार पेठेत छापा, पोलिसांची धडक कारवाई,एकावर गुन्हा दाखल

Raid in Ravivar Peth, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

शहरात सुरू असलेल्या बेकायदा आणि विनापरवाना जनावरांच्या कत्तलीविरोधात गोरक्षकांनी आणि प्राणी मित्रांनी अत्यंत धाडसी व सतर्क कारवाई करत एका मोठ्या बेकायदा प्रकाराचा पर्दाफाश केला आहे. वाई शहरातील रविवार पेठ भागात सुरू असलेल्या या अवैध धंद्यावर पोलिसांनी छापा टाकून अंदाजे ६० किलो गोसदृश्य मांस व कत्तलीचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मानद प्राणी कल्याण अधिकारी तथा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी अभय धनंजय शिंदे यांना गुप्त माहिती मिळाली की, रविवार पेठ येथील एका घरात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदा जनावरांची कत्तल करून मांसविक्री केली जात आहे. या माहितीची गंभीर दखल घेत शिंदे यांनी आपल्या सहकार्‍यांसह तत्काळ वाई पोलीस ठाणे गाठले आणि वरिष्ठांना याची सविस्तर माहिती दिली.

पोलिसांच्या पथकाने तात्काळ पंचांसमवेत आणि पशुवैद्यकीय अधिकार्‍यांना सोबत घेऊन रविवार पेठ येथील संशयित समि अहमद अन्सार चौधरी याच्या घरावर छापा टाकला. घराच्या पुढच्या खोलीची पाहणी केली असता, त्याठिकाणी जनावरांच्या कत्तलीचे सत्र सुरू असल्याचे दिसून आले. आरोपीकडे या कत्तलीबाबत सक्षम प्राधिकरणाकडून कोणतीही लेखी परवानगी किंवा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा करून पत्र्याच्या लोखंडी अँगलला लटकवलेले गोसदृश्य मांस, पोत्याच्या गोनीमध्ये साठवलेले मांस, लोखंडी सतूर, मांस तोडण्याचा लाकडी ओंडका, इलेक्ट्रिक वजन काटा आणि इतर साहित्य असा एकूण १२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी अभय धनंजय शिंदे यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी समि अहमद अन्सार चौधरी याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. डीवायएसपी सुनील साळुंखे आणि पोलिस निरीक्षक प्रदिप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास हेड कॉन्स्टेबल अरुण पाटणकर करीत आहेत. या धडक कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून गोरक्षकांच्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

           ----------------

Sudhakar pant paricharak, anniversary, shivshahi new, advertise,

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !