तीन आरोपींना अटक, ३ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त
शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दोन गंभीर गुन्ह्यांची उकल करत पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत तीन आरोपींना गजाआड केले आहे. या कारवाईत चोरट्यांकडून तब्बल ३ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दत्तनगर, खंडाळा येथील एका बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करण्यात आली होती. कुटुंबीय कामावर गेल्याची संधी साधत चोरट्यांनी १२ ऑगस्ट रोजी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २ लाख १० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. शेजारील घरातही चोरीचा प्रयत्न झाल्याची तक्रार दाखल झाली होती.
या प्रकरणी गोपनीय व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी सराईत गुन्हेगार असल्याचा संशय असलेल्या साहिल विजय कोळी (वय २१, रा. पंढरपूर फाटा, शिरवळ) यास तसेच दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक सतीश आंदेलकर करत आहेत.
दुसऱ्या घटनेत, फुलमळ येथील सर्व्हिस रोडवर एक २३ वर्षीय तरुण हॉटेलमधून जेवण करून पायी चालत असताना दुचाकीवरून आलेल्या चौघांनी त्याला अडवून मारहाण, धमकावणी व दमदाटी करत १७ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेला. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत दोघांना अटक केली. दोन्ही गुन्ह्यांतील तीन आरोपींना सोमवार, २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर व फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली स. पो. नी. नितीन खामगल, पो. उपनिरीक्षक सतीश आंदेलकर, पो. हवा. दत्तात्रय धायगुडे, सचिन वीर, प्रशांत धुमाळ, पो. कॉ. सुरज चव्हाण, अक्षय नेवसे, अक्षय बागाड व काजल शिंगटे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिरवळ पोलीस ठाण्याचे अभिनंदन केले आहे.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



























