रविवारी स्वेरी कॉलेजवर डॉ. बी.पी. रोंगे आणि मान्यवरांच्या हस्ते वितरण
शिवशाही वृत्तसेवा, माळशिरस (वैभव कुलकर्णी)
हनुमान विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, शिंदेवाडी येथील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सौ. मिताली अरविंद देठे आणि मा. श्री. फिरोज शहाजहान मुलाणी यांची प्रतिष्ठेच्या ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ सोहळ्यासाठी अनुक्रमे ‘आदर्श मुख्याध्यापक’ व ‘आदर्श शिक्षक’ या पुरस्कारांसाठी निवड झाली आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील योगदान, समर्पित कार्यशैली, सामाजिक बांधिलकी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान देण्याबरोबरच त्यांच्यामध्ये संस्कार, मूल्ये आणि सकारात्मक विचार रुजविण्यात दोन्ही शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे.
सौ. मिताली अरविंद देठे यांची ‘आदर्श मुख्याध्यापक’, तर मा. श्री. फिरोज शहाजहान मुलाणी यांची ‘आदर्श शिक्षक’ म्हणून निवड झाल्याने शिंदेवाडी परिसरातील शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या यशाबद्दल शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार वितरण सोहळा’ रविवार, २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत, श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
शिक्षण क्षेत्रातील या उल्लेखनीय कामगिरीबद्दल दोन्ही मान्यवरांचे मनःपूर्वक अभिनंदन असून, त्यांच्या कार्यातून भावी पिढीला प्रेरणा मिळावी आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान अधिक व्यापक व्हावे, अशा शुभेच्छा व्यक्त होत आहेत.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



























