जिल्हा परिषद केंद्र शाळा शिंदेवाडीला संस्कृती ताई सातपुते यांची सदिच्छा भेट - शाळेच्या गुणवत्तापूर्ण वाटचालीचे कौतुक

शाळेच्या भौतिक व शैक्षणिक विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर करण्यात आली सकारात्मक चर्चा

Ms. Sanskruti Satpute's visit to the school, Solapur, malshiras, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,माळशिरस (प्रतिनिधी वैभव कुलकर्णी)

 सोलापूर जिल्हा परिषदेच्या सभापती समाज कल्याण संस्कृती ताई सातपुते यांनी जिल्हा परिषद केंद्र शाळा, शिंदेवाडी येथे सदिच्छा भेट देऊन शाळेची प्रत्यक्ष पाहणी केली. शाळेने ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानांतर्गत तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल त्यांनी शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ, शाळाप्रेमी नागरिक, मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांचे विशेष कौतुक केले.

यावेळी संस्कृती ताई सातपुते यांनी शाळेतील प्रत्येक वर्गाला भेट देत विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे विविध प्रश्नांची उत्तरे देत त्यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, शाळेतील शैक्षणिक वातावरण आणि शाळेत झालेला सकारात्मक बदल पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.विद्यार्थ्यांमध्ये बसून त्यांच्यातीलच एक होऊन साधलेला संवाद हा केवळ भेटीचा भाग नव्हता, तर विद्यार्थ्यांप्रती असलेली आपुलकी, संवेदनशीलता आणि त्यांच्या भवितव्याविषयीची सकारात्मक तळमळ व्यक्त करणारा भावनिक क्षण ठरला. संस्कृती ताईंच्या या जिव्हाळ्याच्या संवादामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांमध्ये त्यांच्या भेटीबद्दल विशेष सकारात्मक भावना निर्माण झाली.

शाळेच्या भौतिक व शैक्षणिक विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध योजना जास्तीत जास्त प्रमाणात शाळेपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे आश्वासन संस्कृती ताई सातपुते यांनी दिले.

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांच्या मनातील आत्मविश्वास हीच शाळेच्या प्रगतीची खरी ओळख आहे,’ अशा भावनेतून संस्कृती ताईंनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांशी निर्माण झालेला हा जिव्हाळ्याचा संवाद शाळेच्या भेटीतील अविस्मरणीय क्षण ठरला.

तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळूनही शाळेला प्रशासनाकडून अद्याप बक्षीस किंवा अधिकृत सन्मान मिळालेला नसल्याची बाब पालकांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत तातडीने विचार करून लवकरात लवकर योग्य ती पूर्तता करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

विद्यार्थी संख्या मोठी असल्याने विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी वॉटर प्युरिफायरची मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीची सकारात्मक दखल घेत वॉटर प्युरिफायर लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन संस्कृती ताई सातपुते यांनी दिले.

शाळेचे मुख्याध्यापक अशोक भाऊ व व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लतेश दादा शिंदे यांनी शाळेच्या विकासाशी संबंधित विविध मागण्या व आवश्यक बाबी संस्कृती ताई सातपुते यांच्या निदर्शनास आणून दिल्या. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली.

 ग्रामस्थ, पालक व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संस्कृती ताई सातपुते यांचा शाळा व ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.

विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांच्या एकजुटीतून शिंदेवाडी जिल्हा परिषद केंद्र शाळेने केलेली प्रगती ही निश्चितच कौतुकास्पद असून, हीच सकारात्मक वाटचाल पुढेही कायम ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन संस्कृती ताई सातपुते यांनी केले.

शाळेच्या यशामागे सहभागी असलेल्या सर्वांचे असलेले योगदान अधोरेखित करत त्यांनी सर्वांचे विशेष कौतुक केले आणि भविष्यातही शाळेला जास्तीत जास्त सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

     -----------------

Sudhakar pant paricharak, anniversary, shivshahi new, advertise,

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------


Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !