नवीन वर्गखोल्यांच्या मंजुरीसाठी आधीच प्रस्ताव दाखल; पोषण आहाराबाबत दिला सकारात्मक तोडगा काढण्याचा शब्द
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शूभम कोदे)
"ग्रामीण शिक्षणाचा विकास, हीच आमची प्राथमिकता" हे ब्रीद वाक्यात नव्हे तर कृतीत आणत, सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती ऋतुजा विराज शिंदे आणि वाई-खंडाळा-महाबळेश्वरचे युवा नेते विराज शिंदे यांनी गुरुवार दि. २० ऑगस्ट रोजी जि. प. प्राथमिक शाळा, शहाबाग येथे सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी शाळेच्या अडीअडचणींची प्रत्यक्ष पाहणी करत ग्रामस्थांशी संवाद साधला.
शाळा भेटीदरम्यान विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येनुसार अतिरिक्त वर्गखोल्यांची गरज असल्याचे शाळेच्या शिक्षिका सारिका पवार यांनी निदर्शनास आणून दिले. विशेष म्हणजे, कोणतीही औपचारिकता किंवा मागणी होण्याची वाट न पाहता, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित डोळ्यांसमोर ठेवून सभापती ऋतुजा शिंदे यांनी यापूर्वीच जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे नवीन वर्गखोल्यांच्या मंजुरीसाठी प्रस्ताव दाखल केला आहे. त्यांच्या या दूरदर्शी आणि तत्पर भूमिकेबद्दल शहाबागच्या ग्रामस्थांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानून अभिनंदन केले.
या दौऱ्यात अंगणवाडीतील पोषण आहाराच्या दर्जाबाबत सेविकांनी काही समस्या मांडल्या. यावर अत्यंत संवेदनशीलतेने दखल घेत, सभापतींनी या समस्येवर लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढण्याचे ठाम आश्वासन दिले.
या महत्त्वपूर्ण भेटीप्रसंगी शहाबाग गावाचे सरपंच सागर जमदाडे, उपसरपंच रेखा राजापुरे, किसनवीर कारखान्याचे मा. संचालक लालसिंगराव जमदाडे, विनय कोरडे, किरण जमदाडे, वसंत जमदाडे, सुधीर जमदाडे, सुजाता जमदाडे, माया जमदाडे, जयश्री दाभोळे, पुनम गाढवे, अरविंद कोरडे, अविनाश जमदाडे, शेखर जमदाडे, संदीप कोरडे, निलेश जमदाडे, अशोक जमदाडे, शशिकांत कोरडे, नामदेव राजपुरे, घनश्याम लोळे, शंकर ननावरे, अमोल गाढवे, नंदकुमार नायकवडी, भिकुभाऊ जमदाडे, राजु कुमार कोरडे, अजित जमदाडे, बापु राजपुरे, रमेश सपकाळ, हेमंत भोरे यांच्यासह शाळेच्या शिक्षिका, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभापती ऋतुजा शिंदे यांच्या या लोकोपयोगी आणि गतिमान कार्यशैलीमुळे शहाबाग परिसरातील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



























