सातारा पोलिसांची मोठी कारवाई

संगममाहुली ब्रिज परिसरातून कुख्यात सराईत गुंड गावठी पिस्टल व जिवंत काडतुसांसह जेरबंद

Major police action, Satara, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) पथकाने अत्यंत धडाकेबाज कारवाई करत पुणे येथील एका कुख्यात सराईत गुंडाला जेरबंद केले आहे. आदेश पांडुरंग बिरामणे (वय ३०, रा. धनकवडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुंडाचे नाव असून, त्याच्याकडून एक गावठी पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत, ज्यामुळे सातारा शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

पुणे जिल्ह्यात सदोष मनुष्यवध, मारामारी, हाफ मर्डर आणि मोक्का (MCOCA) यांसारखे ७ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असणारा सराईत गुंड आदेश बिरामणे हा सातारा शहर परिसरातील संगममाहुली ब्रिजजवळ अवैध पिस्टल विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पो.नि. म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर डी.बी. पथकाने दोन पंचांसमक्ष संगममाहुली ब्रिजजवळ संशयितावर लक्ष ठेवून सापळा रचला होता. रात्रीच्या वेळी आरोपी संगममाहुली जाणाऱ्या रस्त्यावरून जात असताना पोलिसांची चाहूल लागताच त्याने अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क असलेल्या पोलिसांनी तात्काळ चारही बाजूंनी घेराव घालून त्यास शिताफीने ताब्यात घेतले.

पोलिसांनी अंगझडती घेतली असता आरोपीच्या कमरेस विनापरवाना व अवैधरित्या बाळगलेले एक गावठी पिस्टल आणि ३ जिवंत राऊंड मिळून आले. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद दाखल करून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदरची उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक  निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. श्रीमती वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग  विपुल पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक  सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक  सुधीर मोरे, पोलीस हवालदार निलेश जाधव, निलेश यादव, विक्रम माने, प्रविण कडव, पोलीस नाईक पंकज मोहिते, तसेच पोलीस कॉन्स्टेबल तुषार भोसले, सागर गायकवाड, मच्छिंद्रनाथ माने, सुहास कदम, सुशांत कदम, वैभव माने, संतोष घाडगे आणि सचिन रिटे यांच्या पथकाने पार पाडली आहे.

      -----------------

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !