वाई शहरात स्वातंत्र्यदिन उत्साहात - ठिकठिकाणी ध्वजारोहण, देशभक्तीपर कार्यक्रमांनी रंगत

लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, विद्यार्थी, पालक आणि वाईकर नागरिकांचा सहभाग

Independence Day celebrated with enthusiasm, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, वाई  (प्रतिनिधी शुभम कोदे)

देशाचा ८०वा स्वातंत्र्यदिन वाई तालुक्यासह शहरात विविध ठिकाणी उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. नगरपालिका प्रशासकीय इमारत, नगरपालिका शाळा क्रमांक पाच, अखिल भाजी मंडई व्यासपीठ, हुतात्मा स्मारक तसेच प्रांत व तहसील प्रशासकीय इमारत येथे ध्वजारोहणाचे कार्यक्रम उत्साहात पार पडले. यावेळी लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, विद्यार्थी, पालक आणि वाईकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

अखिल भाजी मंडई व्यासपीठ येथे नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. कार्यक्रमाला तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी विद्यालयाचे विद्यार्थी, वाईकर नागरिक तसेच सर्व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरपालिका प्रशासकीय इमारत येथे उपनगराध्यक्ष घनश्याम चक्के यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक-नगरसेविका, मुख्याधिकारी तसेच पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नगरपालिका शाळा क्रमांक पाच येथे नगरसेविका पद्मश्री चोरगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, सर्व शिक्षक, स्थानिक लोकप्रतिनिधी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. नवनाथ शिंदे यांच्या सुमधुर आवाजातील देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या गायनाने उपस्थित मंत्रमुग्ध झाले. 

हुतात्मा स्मारक येथे व्यावसायिक कमल अशोक काटे यांच्या हस्ते भारतमाता पूजन करण्यात आले. याच ठिकाणी व्यावसायिक निवृत्ती बाबुराव सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी वाईतील सर्व व्यापारी, वाईकर नागरिक तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रांत व तहसील प्रशासकीय इमारत येथे प्रांताधिकारी योगेश खरमाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तहसीलदार, वाई पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, तहसील व प्रांत कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती , सदस्य, पत्रकार बांधव तसेच वाईकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

विविध ठिकाणी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमांमुळे वाई शहरात सकाळपासूनच देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. तिरंग्याला मानवंदना देत नागरिकांनी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला. देशभक्तीपर गीतांच्या सादरीकरणामुळे आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांना विशेष रंगत आली.

      -----------------

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !