पठाणवस्ती ग्रामपंचायतीकडून कर्तृत्ववानांचा गौरव

बाबासाहेब माने-पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान

Honouring Achievers, Solapur, malshiras, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, माळशिरस ( प्रतिनिधी वैभव कुलकर्णी)

चांदापुरी येथील पठाणवस्ती ग्रामपंचायतीच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंतांचा तसेच पंचायत समिती सदस्य बाबासाहेब माने-पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कर्तृत्वाला प्रोत्साहन देत नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा उपक्रम ग्रामपंचायतीच्या वतीने राबवण्यात आला.

या कार्यक्रमात पठाणवस्तीमधील खालील गुणवंतांचा गौरव करण्यात आला:

कु. इंकरा इस्कान शेख: जर्मनस्थित डॉईचे बँक (Deutsche Bank) या नामांकित बँकेच्या पुणे शाखेत निवड झाल्याबद्दल तिचा विशेष गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित बँकेत मिळविलेले हे यश पठाणवस्तीच्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रगतीचे कौतुकास्पद उदाहरण ठरले आहे.

अँड. निहाल पठाण: पठाणवस्ती गावचे ज्येष्ठ कै. आदमखान पठाण (चेअरमन) यांचे नातू आणि फारुख भाई पठाण यांचे नातू असलेल्या निहाल पठाण यांनी वकिलीची सनद प्राप्त करून कायदे क्षेत्रात पदार्पण केल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला.

सहूरा पठाण: अख्तर पठाण यांच्या सून सहूरा पठाण यांची स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), सातारा शाखेत रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

बाबासाहेब माने-पाटील: पठाणवस्ती ग्रामपंचायतीच्या वतीने पंचायत समिती सदस्य बाबासाहेब माने-पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला. ग्रामीण भागातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांना प्रोत्साहन देण्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या कार्यक्रमाला गावकऱ्यांची आणि प्रतिष्ठित मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यामध्ये प्रामुख्याने:

लोकनियुक्त सरपंच एजाज पठाण

जवाहर शिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य शब्बीर पठाण सर

चांदापुरी विकास सोसायटीचे माजी चेअरमन बशीरखान पठाण

अमीर खान पठाण, फारुख भाई पठाण, अख्तर पठाण, समीर खान पठाण, तन्वीर पठाण, इलियास पठाण, अख्तर पठाण, अंजुम पठाण, बाबुखान पठाण, मोहन पठाण, प्रा. फरहा शेख-पठाण, फिरोज खान पठाण, शाहरुख पठाण, रियाज पठाण, तोहीद शेख, कलीम पठाण यांच्यासह पत्रकार अण्णा भोसले, अंगणवाडी सेविका नसरीन पठाण व ग्रामस्थ, महिला व कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुणवंतांचा सन्मान ही केवळ कौतुकाची बाब नसून, गावातील तरुणाईला शिक्षण, रोजगार आणि कर्तृत्वाची नवी दिशा देणारी प्रेरणादायी परंपरा आहे, असा सूर यावेळी उपस्थामांमधून व्यक्त करण्यात आला. गावातील शैक्षणिक तरुण-तरुणींनी शिक्षण व व्यावसायिक क्षेत्रात मिळविलेले हे यश पुढील पिढीसाठी प्रेरणादायी आहे. ग्रामपंचायत स्तरावर अशा प्रकारे गुणवंतांचा गौरव करणे ही खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकीची जाणीव आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

        -----------------

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------


Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !