सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात पक्ष प्रवेशाने राजकीय भूकंप?
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शेखर गोरे 1 सप्टेंबर रोजी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या संभाव्य पक्षप्रवेशामुळे माण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंना यांचे सख्खे बंधू शेखर गोरे लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्तही ठरला असून १ सप्टेंबरला मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शेखर गोरे यांनी भाऊ व मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात शिवसेनेच्याच चिन्हावर माण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
शेखर गोरे यांनी सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम केले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी जयकुमार गोरे यांच्या विरोधात माण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला असला, तरी त्यांनी मोठी राजकीय चुरस निर्माण केली होती.
त्यानंतर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या चर्चेनंतर शेखर गोरे यांनी माण खटावमधून माघार घेतली होती. त्यावेळी त्यांना आमदारकीचा शब्द दिल्याची चर्चा होती. त्यामुळेच त्यांनी विधानपरिषद निवडणुकीवेळी इच्छा बोलून दाखवली होती. मात्र, जयकुमार गोरे यांनी आपल्या बंधूऐवजी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांना तिकिट मिळवून देत विजयाचा गुलाल उधळला होता. त्यामुळे शेखर गोरे गेल्या काही दिवसांपासून नाराज होते.
त्यातच सातारा जिल्हा बँकेची निवडणूक लढण्याची तयारी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी भाजपचे पॅनेल जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उतरवण्याची तयारी सुरु केली आहे. त्यातच, बंधू शेखर गोरे यांनी पुन्हा एकदा जिल्हा बँकेची निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे आपल्यामुळे अनेकांनी गुलाल उधळला आहे. आता जिल्हा बँकेची निवडणूक मी स्वतः ताकदीने लढणार आहे, असे शेखर गोरे यांनी काही दिवसापूर्वीच स्पष्ट केले होते.
शेखर गोरे हे सोसायटी मतदारसंघातून पुन्हा नशीब अजमावण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्याच माण खटावचे आमदार जयकुमार गोरे हे कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढविणार, याची उत्सुकता आहे. शेखर गोरे यांनी मागील निवडणुकीत सर्वच पक्षाचे लोक विरोधात असतानाही जिल्हा बँकेची निवडणूक जिंकली होती, त्यामुळे त्यांचा कॉफिन्डन्स वाढलेला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शंभुराज देसाईंनी जयकुमार गोरे विरोधात घरातील माणूस फोडला आहे. त्यामुळे आता सातारा जिल्ह्यातील सत्तासमीकरण बदलणार आहे. त्यामुळे या सर्व घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



























