नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय चालणार नाही - ₹२ लाखांचे प्रोत्साहन अनुदान द्यावे

प्रकाश ठुबे यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे निवेदन; शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार

Benefit of loan waiver, chatrapati Sambhaji Nagar, vaijapur, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा ,वैजापूर (प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी)

वैजापूर : अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील दोन जाचक अटी शासनाने काढून टाकल्याच्या निर्णयाचे स्वागत करतानाच, नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, अशी मागणी वैजापूर तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी केली आहे.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ ₹५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान न देता ₹२ लाखांचे प्रोत्साहन अनुदान द्यावे, तसेच मागील तीन कर्जमाफी योजनांमधून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी वैजापूरचे आमदार प्रकाश ठुबे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.

आमदार प्रकाश ठुबे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत यापूर्वीही विधानसभेत अनेक वेळा आवाज उठविला आहे. या निवेदनाची दखल घेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची स्वतः भेट घेऊन नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच वैजापूर तालुक्यासह महाराष्ट्रातील नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे त्यांनी सांगितले.

 प्रमुख मागण्या

- नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ₹५० हजार नव्हे, तर ₹२ लाखांचे प्रोत्साहन अनुदान द्यावे.

- तिन्ही कर्जमाफी योजनांमधून वंचित राहिलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांचा समावेश करावा.

- कागदपत्रांतील चुका अथवा तांत्रिक त्रुटींमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ द्यावा.

सरकारने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन महाराष्ट्रभर तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वैजापूर तालुकाध्यक्ष प्रकाश ठुबे यांनी दिला. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढा सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या वेळी शिंदे शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते भागिनाथ मगर, प्रतापराव धोर्डे, पंचायत समितीचे माजी सभापती, राजेंद्र कराळे (विधानसभा अध्यक्ष तथा माजी संचालक, मार्केट कमिटी), रावसाहेब सावंत (जिल्हाध्यक्ष, सोशल मीडिया), रविंद्र धोर्डे (सरपंच, डोणगाव), कैलास कदम (तालुका उपाध्यक्ष), रामकिसन ठेंग (बूथ कमिटी तालुकाध्यक्ष), काकासाहेब ठुबे (तालुका उपाध्यक्ष, किसान सेना), सुरेश ठुबे, बाजीराव ठुबे, संजय लेंभे, सुभाष धोर्डे, दत्ता डोखे, बाळासाहेब डोखे (चेअरमन, डोणगाव सोसायटी), सागर ठोंबरे, राजेंद्र लेंभे, विजय ठोंबरे, राजेंद्र तुरकणे (सोसायटी, लाखगंगा), निवृत्ती सूर्यवंशी (वळण) यांच्यासह वैजापूर तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते व असंख्य शेतकरी उपस्थित होते.

       -----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

-----------------

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !