पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात - तळेगाव दाभाडेच्या ४ तरुणांचा मृत्यू दोघे जण गंभीर जखमी

सहलीसाठी महाबळेश्वरला जाताना झाला अपघात

Four young Guys killed in terrific road accident, car has totally damage, Satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात: ४ तरुणांचा मृत्यू  पुणे-सातारा महामार्गावर मंगळवारी (११ ऑगस्ट २०२६) मध्यरात्री ऐक ते सव्वा एक वाजण्याच्या सुमारास  झालेल्या भीषण कार अपघातात मावळ आणि तळेगाव दाभाडे परिसरातील ४ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, २ जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहिती अशी की पुण्याहून हे तरुण महाबळेश्वरच्या दिशेने सहलीसाठी निघाले होते. प्रवासादरम्यान भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारी (MH १४ एल जे३०३३) वरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेली मोटार मध्यभागी असलेल्या डिव्हायडरला जोरदार धडकून पलटी झाली आणि उडून विरुद्ध दिशेच्या मार्गीकेमध्ये जाऊन समोरून येणाऱ्या ट्रकला (KA २७ सी ५८७८) धडकली. ही धडक एवढी भीषण होती की, मोटारीचा चक्काचूर झाला.

हा अपघात इतका भीषण होता की कारचा चुराडा झाला आहे. कारमध्ये अडकलेल्यांना दरवाजे कापून बाहेर काढण्यात आलं. अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे वेदांत वारिंगे (वय 19), सोनलिंग ठाकूर (वय 19), आदित्य बाळासाहेब गरूड (वय 19), निखिल बाळू राऊत (वय 20)यांचा मृत्यू झाला तर दयानंद पुजारी,  मयूर हनुमंत शिंदे (दोघेही वय २०, रा. कामशेत) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत

पुण्याहून साताऱ्याच्या दिशेनं जात असताना कारवरील ताबा सुटून गाडी डिव्हायडरला धडकली. डिव्हायडर ओलांडून कार विरुद्ध दिशेच्या लेनवर गेली. त्यानंतर समोरून येणाऱ्या आयशर ट्रकला धडक दिली. शिरवळ इथं हॉटेल शिवालयसमोर रात्री एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

अपघातानंतर मोठा आवाज झाल्यानंतर स्थानिक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पोलिसांना अपघाताची माहिती दिली. महामार्ग पोलीसही घटनास्थळी पोहोचले. क्रेनच्या सहाय्यानं अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

-----------------

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !