आरंभ संस्थेकडून एकसर केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य

शैक्षणिक विकासासाठी संस्थेचे भरीव योगदान

Study material to student, eksar, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे) 

जिल्हा परिषद केंद्र शाळा, एकसर येथे आरंभ संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना देणाऱ्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले.

कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मयूर चव्हाण, तज्ज्ञ मार्गदर्शक बाळकृष्ण तरडे तसेच मुख्याध्यापिका प्रभावती थोरवे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

आरंभ संस्थेच्या श्रीमती शोभामूर्ती यांच्या पुढाकारातून एकसर शाळेत यापूर्वी मुला-मुलींसाठी स्वतंत्र शौचालय, शाळेचे रंगकाम, फरशी बसविणे तसेच हँडवॉश स्टेशनची उभारणी करण्यात आली आहे. गतवर्षी महिलांसाठी कौशल्य विकास कक्ष आणि आधुनिक अंगणवाडीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. आगामी काळात शाळेत संगणक प्रयोगशाळा उभारण्यात आल्यास विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाचा लाभ मिळून त्यांच्या गुणवत्तेत अधिक भर पडणार असल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले.

मुख्याध्यापिका प्रभावती थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा शैक्षणिक गुणवत्ता, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षणामुळे सातत्याने प्रगतीपथावर आहे. एकसर गावाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी आरंभ संस्थेने दिलेल्या योगदानाबद्दल ग्रामस्थांनी श्रीमती शोभामूर्ती यांचे विशेष कौतुक करत कृतज्ञता व्यक्त केली. 

या सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लोहारे शाळेचे मुख्याध्यापक शेखर जाधव यांचेही मोलाचे योगदान लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुनाथ राठोड यांनी केले, तर आभार फुलचंद महांगडे यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन सौ. घोडके यांनी केले. या प्रसंगी गावातील ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !