सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आगाशिवनगर शाखेच्या वतीने सहकार मेळावा संपन्न

सुरक्षित बँकिंग आणि सरकारी योजनांचा जागर!

Satara DCC cooperative Bank, Co-operative Summit, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., शाखा आगाशिवनगर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'सहकार मेळाव्यास' ग्राहक, सभासद, महिला बचत गट आणि स्थानिक ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास आणि आर्थिक साक्षरता वाढवणे या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 

मेळाव्यात मार्गदर्शन करताना आगाशिवनगर शाखेच्या शाखाप्रमुख सुनिता साळुंखे यांनी बदलत्या काळातील डिजिटल बँकिंगचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणल्या की, "मोबाईल बँकिंग, एटीएम आणि यूपीआय मुळे बँकिंग व्यवहार अत्यंत सोपे झाले आहेत. मात्र, वाढत्या सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे." कोणत्याही व्यक्तीला आपल्या बँक खात्याची गोपनीय माहिती, ओटीपी किंवा पासवर्ड शेअर न करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच सुरक्षित बँकिंग व्यवहारांसाठी आवश्यक दक्षता घेण्याच्या टिप्स देत त्यांनी महिला बचत गटांच्या कामकाजाविषयी सविस्तर माहिती दिली.

बँकेचे विकास अधिकारी सुशील थोरवडे यांनी उपस्थितांना बँकेच्या विविध कर्ज व ठेव योजनांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये पीक कर्ज, वैयक्तिक, गृह, आणि वाहन कर्जाचा प्रामुख्याने समावेश होता. विकास सेवा सोसायट्या आणि जिल्हा बँक यांच्यातील समन्वयातून शेतकरी व सभासदांना मिळणाऱ्या विविध सुविधांवर त्यांनी प्रकाश टाकला. 

विशेषतः महाराष्ट्र शासनाच्या 'अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती व कर्ज प्रोत्साहन योजना' याविषयी सविस्तर माहिती देऊन, या योजनेची पात्रता, मिळणारा लाभ आणि आवश्यक कागदपत्रांची कार्यपद्धती त्यांनी सोप्या भाषेत समजावून सांगितली. तसेच उपस्थित शेतकऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या विविध शंकांचे त्यांनी निरसन केले. 

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन निलेश माने यांनी केले. त्यांनी उपस्थित ग्रामस्थ, ग्राहक आणि सभासदांचे आभार मानून बँकेच्या या लोककल्याणकारी योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. 

या सहकार मेळाव्यास आगाशिवनगर परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, बँकेच्या विकास सेवा सोसायट्यांचे पदाधिकारी, सचिव, सभासद आणि महिला बचत गटांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने हजेरी लावून हा कार्यक्रम यशस्वी केला. बँकेच्या या उपक्रमाचे परिसरामध्ये कौतुक होत आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !