आज सायंकाळी - मलकापूर फाट्यावर ६ जुलैला रास्ता रोको

सेवा रस्ते, खड्डे आणि तुंबलेल्या गटरांवर नागरिकांचा संताप

Rasta Roko andolan, road block protest, Malkapur, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे) 

मलकापूर हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ व त्यालगतच्या दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्यांची दुरवस्था, मोठमोठे खड्डे आणि तुंबलेल्या गटरांमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आले असून संतप्त नागरिकांनी सोमवार, ६ जुलै रोजी दुपारी ४ वाजता मलकापूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सेवा रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे दररोज लहान-मोठे अपघात घडत असून वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. दुसरीकडे दोन्ही बाजूंच्या गटारी तुंबल्याने खंडोबानगर, थोरात मळा, सकपाळ मळा, जानवी मळा आदी परिसरातील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरत असून नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच पश्चिमेकडील शेतकऱ्यांच्या घरांमध्ये आणि शेतांमध्येही पाणी साचल्याने शेतीचे नुकसान होत असल्याची तक्रार आहे.

या प्रश्नावर गेल्या तीन वर्षांपासून विविध स्तरांवर पाठपुरावा करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपविभागीय अधिकारी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच संबंधित खासगी कंपनीकडे अनेक वेळा निवेदने देण्यात आली. संबंधित आमदार, खासदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनीही बैठका घेऊन कामे तातडीने करण्याचे निर्देश दिले. मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

शनिवारीही आ. अतुल भोसले, आ. धैर्यशील कदम, खा. नितीन पाटील, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. नगरसेविका डॉ. स्वाती थोरात यांनीही प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याची माहिती देण्यात आली.

प्रशासनाने ४ आणि ५ जुलैपर्यंत सेवा रस्त्यांवरील खड्डे बुजवून गटारींची साफसफाई पूर्ण करावी, अन्यथा ६ जुलै रोजी दुपारी ४ वाजता मलकापूर फाटा येथे नागरिक, विद्यार्थी आणि पालकांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

आंदोलनादरम्यान वाहतूक कोंडी व गैरसोय होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस प्रशासन, वाहतूक विभाग, तहसीलदार, प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने दखल घ्यावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि मूलभूत सुविधांसाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !