या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सोमवार, दि. ६ जुलै २०२६ रोजी महाबळेश्वर, पाटण, जावळी, वाई आणि सातारा या पाच तालुक्यांतील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित तालुक्यांतील सर्व शाळांनी शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी, तसेच पालकांनीही विद्यार्थ्यांना घराबाहेर न पाठवता सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असून नदी-नाले आणि धरणांतील पाण्याची पातळी वाढत आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



