जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन खासदार नितीन पाटील व पत्नी सौ. प्रतिमा नितीन पाटील यांच्या हस्ते पूजन होणार
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे )
भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना व खंडाळा येथील किसन वीर-खंडाळा सहकारी साखर उद्योगाच्या सन २०२६-२७ मील रोलरचे पुजन सोमवार (दि. ६) रोजी खंडाळा कारखान्याचा सकाळी १० वाजता तर किसन वीर कारखान्याचा दुपारी १२ वाजता सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन खासदार नितीन पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. प्रतिमा नितीन पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी दिली.
प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने अत्यंत काटकसरीने व पारदर्शकपणे कारभार सुरु असुन ऊस उत्पादकांच्या ऊस बीलाची संपुर्ण रक्कम वर्ग केलेली आहे. सन २०२६- २७ च्या गाळप हंगाम विहीत वेळेत सुरू करण्यादृष्टीने कारखान्यातील अंतर्गत कामेही प्रगतीपथावर आहेत. किसन वीर व खंडाळा हे दोन्ही कारखाने पुर्ण क्षमतेने चालतील अशा पद्धतीने तोडणी वाहतूक यंत्रणाही भरण्यात आलेली आहे. भविष्यात येणारा काळ हा किसन वीर व खंडाळा कारखान्यासाठी नवीन आशा घेऊन येणारा ठरणार असल्याचा विश्वासही प्रमोद शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
सन २०२६-२७ च्या मील रोल पजन समारंभासाठी किसन वीर व खंडाळ कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व सभासद बंधु-भगिनी, हितचिंतक, कंत्राटदार, वाहन मालक आणि कार्यकर्त्यानी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही किसन वीर कारखान्याच व्हार्ईस चेअरमन प्रमोद शिंदे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, खंडाळा कारखान्याचे चेअरमन व्ही. जी. पवार, व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे, कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील व दोन्ही कारखान्याच्या संचालक मंडळाने केले आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



