पंचायत समिती सभापती विक्रांत डोंगरे यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी

पूरग्रस्त जांभळी गावकऱ्यांना  दिला आधार

Inspection of flood-affected areas, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

वाई तालुक्यातील जांभळी खोऱ्यात व परिसरात झालेल्या  मुसळधार पावसामुळे ओढ्यावरील पूल वाहून गेल्याने गावाचा संपर्क तुटला  आहे परिसरात मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत सुमारे सात गाईही पुराच्या पाण्यात वेगात वाहून गेल्या.

या गंभीर घटनेची माहिती मिळताच वाई पंचायत समितीचे सभापती  विक्रांत  डोंगरे यांनी मुसळधार पडत असलेल्या भर पावसात नुकसानग्रस्त भागाची  आपल्या सहकाऱ्या सोबत तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. व त्यांनी  नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांना धीर दिला.

विक्रांत डोंगरे यांनी संबंधित शासकीय अधिकारी व यंत्रणांशी संपर्क साधून मदतकार्य तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या. पूल वाहून गेल्यामुळे वाहतुकीसह ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला असून शेती आणि पशुधनाचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

यावेळी नागरिकांनी आपल्या तीव्र व्यथा सभापती विक्रांत डोंगरे यांच्यासमोर मांडली. नुकसानग्रस्तांना शक्य ती सर्व मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या भेटीमुळे पूरग्रस्त जाभळी ग्रामस्थांना दिलासा मिळाला असून प्रशासनाकडून झालेल्या नुकसानीचा पंचनामा व पुढील उपाययोजना गतिमान सुरू आहेत. 

सभापती विक्रांत डोगरे यांच्या दौऱ्यामुळे पूरग्रस्त जांभळी ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !