मिनी बसची आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा येथील डीमार्टसमोर (दि. २१ जून) पहाटे भीषण अपघात झाला. कोल्हापूरहून जेजुरीकडे जाणाऱ्या मिनी बसची आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातात स्नेहल उत्तम कांबळे आणि एकनाथ बापू कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तसेच बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमचे कार्यकर्ते रोहित बनसोडे, बबलू पवार, अनिकेत भांडे, ऋषी रंकाळे आणि अजय शिंगे यांनी घटनास्थळी तत्परतेने मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



