हनुमानवाडी येथे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या उपस्थितीत मातृ-पितृ व शालेय विद्यार्थी सन्मान सोहळा संपन्न

निवेदिका वैष्णवी यादव यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम

Felicitation of Meritorious Students, MLA Ram satpute, malshiras, Solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, माळशिरस (प्रतिनिधी वैभव कुलकर्णी)

हनुमानवाडी (ता. माळशिरस) येथील प्रख्यात निवेदिका कुमारी वैष्णवी मल्हारी यादव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, माळशिरस तालुक्याचे माजी आमदार मा. श्री. रामभाऊ सातपुते यांच्या शुभहस्ते आणि प्रमुख उपस्थितीत शालेय विद्यार्थी सन्मान, शालेय साहित्य वाटप व मातृ-पितृ सन्मान सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. उत्तम निवेदिका वैष्णवी ताई आणि माजी सरपंच मल्हारी यादव यांच्या संकल्पनेतून या कौतुकास्पद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

​विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी व्यासपीठ: वैष्णवी यादव

​कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुमारी वैष्णवी यादव यांनी प्रास्ताविक केले. "हनुमानवाडी गावातील विद्यार्थ्यांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलागुणांना नवीन चालना मिळावी आणि शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा मिळावी, याच उद्देशाने या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे," अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थित गरजू विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटपही करण्यात आले.

​यादव घराण्यातील नवनियुक्त डॉक्टर्स व विधिज्ञांचा विशेष सन्मान

​या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यादव घराण्याचा अभिमान वाढवणाऱ्या गुणवंतांचा करण्यात आलेला विशेष गौरव. नुकतीच वैद्यकीय पदवी संपादन केलेले डॉ. चि. संदेश राजेंद्र यादव (MBBS) आणि विधी क्षेत्रात पदवी संपादन केलेल्या अॅड. सौ. सोनल अमोल यादव यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

​वैष्णवी यांच्या कार्याप्रती असलेल्या एकनिष्ठेचे कौतुक: रामभाऊ सातपुते

​माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी आपल्या मनोगतातून कुमारी वैष्णवी यादव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. समाजकार्याची आवड आणि आपल्या कार्याप्रती असलेली त्यांची एकनिष्ठा वाखाणण्याजोगी आहे, अशा शब्दांत त्यांनी वैष्णवी यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.

​हनुमानवाडीच्या विकासासाठी ५० लाखांचा निधी मंजूर!

​सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती सौ. संस्कृतीताई राम सातपुते यांनी हनुमानवाडी ग्रामस्थांसाठी एक मोठी भेट दिली आहे. त्यांनी कुरबावी ते हनुमानवाडी रस्त्यासाठी तब्बल ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. त्यांच्या या विशेष योगदानाबद्दल हनुमानवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे जाहीर आभार मानण्यात आले.

​मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती

​या दिमाखदार सोहळ्याला माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्यासह भानुदास राऊत, शिवराज पुकळे, बापू सुळ, राजेंद्र पांढरे, महादेव केसकर , गणेश पाटील, हनुमानवाडी गावचे ज्येष्ठ नेते शिवाजी धायगुडे, छगन रुपनवर, माजी पोलीस पाटील दत्तात्रय यादव, उद्योजक अमोल यादव यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !