शिवसह्याद्री अभ्यासिकेचे उत्साहात उद्घाटन

स्पर्धा परीक्षा, सैन्य व पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज केंद्र

Inauguration of Shiv-Sahyadri Study Centre, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

स्पर्धा परीक्षा तसेच सैन्य, पोलीस आणि इतर शासकीय सेवांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत हक्काचे आणि सुसज्ज हक्काचे ठिकाण असलेल्या ‘शिवसह्याद्री अभ्यासिकेचे’ उद्घाटन नुकतेच अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावूक वातावरणात पार पडले. देशसेवेसाठी सर्वोच्च बलिदान देणारे शहीद जवान सूरज मोहिते यांच्या मातोश्रींच्या हस्ते या अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले. एका वीरमातेच्या हस्ते झालेल्या या उद्घाटनाने उपस्थित विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये नवा उत्साह आणि देशभक्तीची भावना निर्माण झाली.

     ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन, शांत व सुसज्ज अभ्यासाचे वातावरण तसेच स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राजेंद्र खरात व प्रशांत डोंगरे यांनी संयुक्तपणे या शिवसह्याद्री अभ्यासिकेची उभारणी केली आहे. अनेक युवकांना योग्य दिशा मिळावी आणि त्यांची शासकीय सेवांमध्ये निवड व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.

     या उद्घाटन सोहळ्यास नगरसेवक अजित शिंदे, नगरसेवक सुशील खरात, बापूराव खरात, फौजी सौरभ गायकवाड, माजी सैनिक शिवाजी घाडगे यांच्यासह अनेक पालक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी खरात आणि डोंगरे यांच्या या कौतुकास्पद उपक्रमाची प्रशंसा केली. तसेच, विद्यार्थ्यांनी केवळ स्वप्न न पाहता शिस्त, जिद्द आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांच्या जोरावर यश संपादन करावे, असे आवाहन केले.

     शिवसह्याद्री करिअर अकादमीने आजवर बजावलेली कामगिरी अत्यंत नेत्रदीपक आहे. अकादमीच्या माध्यमातून आजपर्यंत ७५० हून अधिक युवक भारतीय सैन्यदल, पोलीस दल तसेच विविध सरकारी व निमसरकारी सेवांमध्ये यशस्वीपणे रुजू झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक युवकांना हक्काच्या रोजगाराची संधी मिळाली असून त्यांचे भविष्य उज्ज्वल झाले आहे.

     विशेष म्हणजे, शिवसह्याद्री करिअर अकादमी केवळ परीक्षांच्या प्रशिक्षणापुरती मर्यादित राहिलेली नाही. सामाजिक भान जपत या अकादमीने नेहमीच मोलाचे कार्य केले आहे. मग ते डोंगर परिसरात लागलेले वनवे विझविणे असो, पूर व इतर नैसर्गिक आपत्तीच्या काळात धावून जाऊन मदत व बचावकार्य करणे असो, की गरजू नागरिकांना वेळेवर सहाय्य करणे असो, अकादमीने आपल्या सामाजिक बांधिलकीतून समाजात एक वेगळा आणि आदराचा स्थान निर्माण केला आहे.

     "विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि अभ्यासाला गती देण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही अभ्यासिका स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांसाठी मोठी प्रेरणा ठरेल. भविष्यात या केंद्रातून आणखी अनेक यशस्वी अधिकारी, देशरक्षक सैनिक आणि कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी घडतील," असा ठाम विश्वास यावेळी उपस्थित मान्यवर व पालकांनी व्यक्त केला.

     या नवीन अभ्यासिकेमुळे परिसरातून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !