अतिवृष्टीमुळे साताऱ्यात घराची पडझड - दोन मुले किरकोळ जखमी

नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी जखमींची विचारपूस करत उपचाराची घेतली माहिती

House collapses due to heavy rain, Satara, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

सातारा  शहरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सदर बाजार परिसरातील लक्ष्मी टेकडी येथे एक घर कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत संगीता अण्णा माने यांच्या घराची पडझड झाली असून, त्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी किरकोळ जखमी झाले आहेत.

जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नगरसेविका रीना भणगे आणि तानाजी भणगे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली.

दरम्यान, नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. तसेच उपस्थित डॉक्टरांशी चर्चा करून जखमींवर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली. अतिवृष्टीमुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !