राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत ओझर्डे जि. प. शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषदेत सत्कार

विद्यार्थ्यांच्या यशामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेत भर पडत आहे.

Felicitation of students who received scholarships Examination, Satara,wai , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई प्रतिनिधी शुभम कोदे

राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा, तसेच ओझर्डे शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद सातारा यांच्या वतीने गौरव व सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष राजू भोसले, महिला व बालकल्याण सभापती ऋतुजा शिंदे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाबर, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, माध्यमिक शिक्षण अधिकारी धनंजय चोपडे, प्राथमिक शिक्षण अधिकारी अन्निस नायकवडी तसेच श्रीमती शबनम मुजावर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या यशामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेत भर पडत असून, भविष्यातही अशाच प्रकारे गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !