खावली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक महिला मारहाण प्रकरण
शिवशाही वृत्तसेवा, वाई - प्रतिनिधी शुभम कोदे
गेल्या चार दिवसांपूर्वी वाईच्या पश्चिम भागातील खावली ता. वाई येथील प्राथमिक शाळेतील मुख्याद्यापक धर्मेंद्र दिक्षित यांनी वर्ग शिक्षिका महिलेला बेदम मारहाण केल्याने जिल्हा परिषद शिक्षण विभागाने निलंबित केले असून त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या जिल्हा अध्यक्षा डॉ.प्रियाताई शिंदे, शिक्षण सभापती तेजस्विनी कदम, महिला बालकल्याण सभापती ऋतुजा शिंदे यांनी गटविकास अधिकारी नारायण घोलप, तालुका शिक्षण अधिकारी हर्षवर्धन मोरे, यांना बरोबर घेवून खावली येथील शाळेला अचानक भेट देवून आढावा घेतला. यावेळी त्यांनी तालुका शिक्षण अधिकारी, केंद्रप्रमुख यांच्यासह अधिकाऱ्यांना धारेवर धरत शिक्षणा सारख्या पवित्र क्षेत्रात महिलांवर होणारा अत्याचार खपवून घेतला जाणार नाही. असा सज्जड दम देत वाई तालुक्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर भर द्यावा व पटसंख्या कमी होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.प्रियाताई शिंदे खावली शाळेला भेटी प्रसंगी दिल्या. यावेळी माजी जिल्हापरिषद अध्यक्ष अरुणादेवी पिसाळ, जिल्हापरिषद सदस्य बापूसाहेब शिंदे, पंचायत समिती सदस्य स्वप्नील गायकवाड, मुख्याद्यापक श्री फणसे युवा नेते विराज शिंदे, तेजस जमदाडे, सागर पवार, यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे यांनी अनेक महत्वाच्या सूचना देत वाई तालुका जिल्हा परिषद शिक्षण विभागात चांगले काम चालेले असताना, अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत शाळेचे नाव उज्वल करीत असताना मुख्याद्यापक धर्मेद्र दीक्षित यांनी शिक्षण क्षेत्राला काळीमा फासण्याचे कृत्य केले आहे. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केलेली आहेच परंतु यापुढे असे गैर कृत्य करणाऱ्याची गय केली जाणार नाही. दीक्षित यांना जास्तीत-जास्त कडक शिक्षा करण्यासाठीचा रिपोर्ट करण्यास भाग पाडणार असल्याचेही अध्यक्षा यांनी सूचित केले. यावेळी खावली ग्रामस्थांनी मुख्याद्यापक दीक्षित यांच्या कारनाम्याचा पाढाच वाचला. अतिशय विक्षिप्त असा दीक्षित यांचे वर्तण होते, कोणत्याही क्षिकांबरोबर पटत नसल्याचे सांगत शाळेतील मुलांनाही त्याने मारहाण केल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेच्या कोणत्याही शाळेत असा प्रकार होणार नाही याची दक्षता देतली जाणार असल्याचेही आवर्जून सांगितले. तसेच यावेळी अध्यक्षा, शिक्षण सभापती, महिलाबाल कल्याण सभापती यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शाळेतील शिक्षांबद्दलचे मत जाणून घेतले. तसेच गटविकास अधिकारी नारायण घोलप यांच्याशी चर्चा करून अनेक सूचना केल्या तसेच खावली ग्रामस्थांनी शिक्षक नवीन देण्याची विनंती अध्यक्षांना केली. तसेच ग्रामस्थांकडून सर्व सहकार्य राहील असेही अस्वासित केले. यावेळी अध्यक्षांनी उपस्थितांबरोबर संपूर्ण शाळेची पहाणी करीत राबवीत असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



