अंधानेरच्या विकासकामांचे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक

सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही

Appreciation from the District Collector, development work, Chhatrapati Sambhaji Nagar, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, छ. संभाजीनगर (उपसंपादक मनोज चव्हाण)

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. श्री. विनय गोंडा यांनी आज अंधानेर ग्रामपंचायतीला भेट देऊन विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी आदर्श ग्रामपंचायत अंधानेरचे सरपंच तथा प्रशासक मा. श्री. अशोकरावजी दाबके यांच्या शुभहस्ते जिल्हाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी गावातील सुरू असलेल्या विकासकामांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. तसेच वृक्षलागवड, विशेष संक्षिप्त मतदार पुनर्निरीक्षण (SIR), मतदार यादी अद्ययावतीकरण, BLO अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेऊन आवश्यक सूचना दिल्या.

यावेळी उपविभागीय अधिकारी मा. श्री. संतोष गोरड, तहसीलदार मा. सौ. सारिका भगत, गटविकास अधिकारी मा. श्री. रामावत, तालुका कृषी अधिकारी मा. श्री. संदीप शिरसाट, मंडळाधिकारी, तलाठी आप्पा कुंटे, आप्पा कंचार, ग्रामविकास अधिकारी मोरस्कर सर, कैलास मालकर, ग्रामपंचायत सदस्य संजय पांडे, आसिफ मिस्तरी, सोमनाथ काळे, कारभारी नेवगे, सुभाष जाखड, सद्दाम शेख, केंद्रप्रमुख गणेश सोनवणे, किरण ताडा, विकी आहेर, केवट सर, दांगट सर, सोनवणे सर, अंगणवाडी सेविका, महिला बचत गटाच्या प्रतिनिधी, आशा कार्यकर्त्या, शिक्षक-शिक्षिका, ग्रामपंचायत कर्मचारी नवनाथ राहणे, कृष्णा नेवगे, पवन तोडावत, विकास काळे, विनोद गायकवाड, संतोष सातदिवे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. विनय गोंडा यांनी अंधानेर गावातील विकासकामांचे कौतुक करत, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !