महिला सक्षमीकरणाला नवी दिशा

ज्ञानमुद्रा महिला प्रभागसंघाची पाचवी वार्षिक सभा उत्साहात

Annual Meeting, Meeting of Jnanamudra Women's Ward Association, Satara, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे) 

महिला बचत गटांचे सक्षमीकरण, एकल महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी ठोस नियोजन आणि आरोग्य जनजागृतीचा संदेश देणारी ज्ञानमुद्रा महिला प्रभागसंघ, भादे (ता. खंडाळा) यांची पाचवी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दि. २ जुलै रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेत महिला सक्षमीकरणाशी निगडित विविध महत्त्वपूर्ण ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

     सभेस जिल्हा परिषद सातारा समाजकल्याण सभापती ऋषीकेश धायगुडे-पाटील, पंचायत समिती खंडाळा उपसभापती संतोष वीर, सदस्य यशवंत खुंटे, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, तालुका अभियान व्यवस्थापक प्रविण खुडे, तालुका व्यवस्थापक (एफआय) काशिनाथ कुंभार, तालुका व्यवस्थापक (एमआयएस) राजेश चव्हाण तसेच ब्लॉक अँकर मनोज माने यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रभागसंघाच्या अध्यक्षा विदुला भालेराव होत्या.

     सभेत मागील सभेच्या इतिवृत्तास मंजुरी देण्यात आली. वार्षिक कामकाज व आर्थिक अहवाल सादर करून त्यास मंजुरी देण्यात आली. आगामी वर्षात महिला बचत गट अधिक सक्षम करण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणे, उद्योग-व्यवसायाला चालना देणे आणि महिलांचे आर्थिक स्वावलंबन वाढविण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

     यावेळी प्रभागातील एकल महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. वैयक्तिक अर्थसाहाय्याच्या माध्यमातून उद्योग-व्यवसाय उभारणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला, तर नावीन्यपूर्ण कार्य करणाऱ्या बचत गटांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

     'सेकंड चान्स' उपक्रमात अधिकाधिक महिलांनी सहभागी व्हावे, एकल महिलांना दोन उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, तसेच महिलांसाठी नवीन विकासात्मक उपक्रम राबविण्याचे ठराव सभेत मंजूर करण्यात आले.

     एफएनएचडब्ल्यू उपक्रमांतर्गत आरोग्य विभागाच्या सहकार्याने महिलांची आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

     सभेची सांगता आभार प्रदर्शनाने झाली. प्रभाग समन्वयक रेश्मा धायगुडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व मान्यवर, महिला बचत गट आणि सदस्यांचे आभार मानले.

    -----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !