सैनिक सहकारी बँकेविरोधात माजी सैनिकांचे रणशिंग

चेअरमन व संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Allegations against Sainik Bank, wai, Satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

कर्नल आर. डी. निकम सैनिक सहकारी बँक लि., सातारा येथील कथित मनमानी कारभाराविरोधात सैनिक फेडरेशन माजी सैनिक संघटनेने आक्रमक भूमिका घेत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा यांच्याकडे निवेदन सादर केले. बँकेच्या कारभाराची सखोल व निष्पक्ष चौकशी करून चेअरमन व संचालक मंडळाला तात्काळ बरखास्त करण्यात यावे, अशी ठाम मागणी संघटनेने केली आहे. 

गुरुवार (दि. २३ जुलै) रोजी देण्यात आलेल्या या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, सहकार मंत्री, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच तालुका उपनिबंधक यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

निवेदनात म्हटले आहे की, स्वर्गीय कर्नल आर. डी. निकम यांनी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या हितासाठी ही सहकारी बँक स्थापन केली होती. त्यांच्या कार्यकाळात सभासदांना सन्मानाची वागणूक मिळत होती. वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस, वार्षिक अहवाल वेळेवर मिळत असल्याने सभासदांना सभेत सहभागी होऊन प्रश्न उपस्थित करण्याची संधी मिळत होती.

मात्र, गेल्या काही वर्षांपासून परिस्थिती बदलल्याचा आरोप सैनिक फेडरेशनने केला आहे. विशेषतः दि. १२ जुलै २०२६ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस व वार्षिक अहवाल सैनिक व कुटुंबीय सभासदांना देण्यात आला नसल्याने त्यांना सभेत उपस्थित राहून प्रश्न मांडण्याच्या व हरकती नोंदविण्याच्या वैधानिक अधिकारापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवण्यात आल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी सैनिक फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सैनिक बँकेचे चेअरमन स्वतः सेवानिवृत्त सैन्य अधिकारी असूनही सैनिक व त्यांच्या कुटुंबीय सभासदांच्या हिताकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे बँकेच्या कारभाराची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी सैनिक फेडरेशनचे प्रशांत कदम, सातारा तालुका अध्यक्ष प्रवीण शिंदे, जिल्हा सचिव डॉ. ॲड. संजय लावंड, कॅप्टन संतोष धुमाळ, रामचंद्र इंगळे, आमिर शिंदे, आनंदराव शिंगाडे, अनिल शिंदे, संदीप पाटील, हणमंत बिचकर, उमाजी सूर्यवंशी, मारुती हूलवान, विजय माने यांच्यासह मोठ्या संख्येने माजी सैनिक व कुटुंबीय सभासद उपस्थित होते.

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !