साहित्यिकांचा सन्मान! परिमल सांस्कृतिक व्यासपीठच्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांचे शनिवारी पंढरपुरात वितरण

प्रा. कुराडे पाटील, बागल, बंगाळे आणि जीवन पाटलांना 'जीवन परिमल' गौरव - विविध श्रेणींतील पुरस्कार जाहीर

State Level Literary Award, parimal sanskrutik vyaspith, pandharpur, Solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
तालुक्यातील रोपळे बुद्रुक येथील 'परिमल सांस्कृतिक व्यासपीठ'च्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या प्रसिद्ध राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यंदाचा सर्वोच्च 'जीवन परिमल जीवन गौरव पुरस्कार' प्रा. किसनराव कुराडे पाटील, प्रा. शिवाजीराव बागल, जीवन पाटील आणि प्रा. भास्कर बंगाळे या ज्येष्ठ साहित्यिकांना जाहीर झाला असून, शनिवार दिनांक १३ जून २०२६ रोजी या पुरस्कारांचे दिमाखदार सोहळ्यात वितरण होणार आहे.
साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय आणि भरीव योगदान देणाऱ्या लेखक, कवी व साहित्यिकांना दरवर्षी या व्यासपीठामार्फत सन्मानित करण्यात येते. शाल, पुष्पगुच्छ, पुस्तकांचा संच आणि सन्मानचिन्ह असे या राज्यस्तरीय पुरस्कारांचे स्वरूप आहे.

हा गौरव सोहळा शनिवार, दिनांक १३ जून २०२६ रोजी संपन्न होणार असून या कार्यक्रमाला साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे:
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठ, सहाय्यक कुलसचिव तथा मराठी भाषा दक्षता अधिकारी, प्रा. डॉ. शिवाजी शिंदे हे असतील तर मराठी साहित्य परिषद, पुणे शाखा पंढरपूर अध्यक्ष सिद्धार्थ ढवळे उद्घाटक आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूरचे युवा नेते प्रणव परिचारक आणि आदर्श माता व सामाजिक कार्यकर्त्या मा. पुष्पलता निकम उपस्थित राहणार आहेत.


विविध श्रेणींतील पुरस्कार विजेते साहित्यिक पुढीलप्रमाणे: 

जीवन परिमल
प्रा. किसनराव कुराडे पाटील (कोल्हापूर)
प्रा. शिवाजीराव बागल (पंढरपूर)
मा. जीवन पाटील (पंढरपूर)
मा. भास्कर बंगाळे (पंढरपूर)

काव्य परिमल
मा. मारुती कटकधोंड (सोलापूर)
मा. रावसाहेब साठे (जत)
मा. बबन धुमाळ (दौंड)
मा. वासंती वैद्य (पुणे)
मा. हेमंत रत्नपारखी (मंगळवेढा)

कथा परिमल
मा. राजेंद्र भोसले (सोलापूर)
मा. मधुकर फरांडे (हातकणंगले)
मा. अनिता जाधव (नांदेड)
मा. डॉ. मारुती नलावडे (ठाणे)
मा. डॉ. अनंत कडेठाणकर (छ. संभाजीनगर)

साहित्य परिमल
मा. ना. तु. पोघे (छ. संभाजीनगर)
मा. सुनील देसाई (भुदरगड)
मा. प्रा. सुजितकुमार कांबळे (मंगळवेढा)
मा. प्रा. शिवाजीराव वाघमारे (पंढरपूर)
मा. दिनेश फडतरे (पुणे)

उदय परिमल पुरस्कार
मा. हभप. सूर्याजी भोसले (पंढरपूर)
मा. प्रा. नागेश सिंघण (पंढरपूर)
मा. संतोष मंजुळे (करमाळा)
मा. गंधार कुलकर्णी (अमरावती)
मा. संतोष रायबान (मंगळवेढा)
मा. मारुती वाघ (पुसेगाव)

सेवा परिमल
मा. प्रकाश जडे (मंगळवेढा)
मा. प्रा. शशिकांत जाधव (मंगळवेढा)
मा. डॉ. विजयकुमार देशमुख (मुंबई)
मा. प्रा. दादासाहेब खरात (पंढरपूर)
मा. वंदना कुलकर्णी (सोलापूर)
मा. भारत सातपुते (लातूर)

रोपळे बुद्रुक येथील परिमल सांस्कृतिक व्यासपीठाने गेल्या अनेक वर्षांची आपली गौरवशाली परंपरा कायम ठेवत यंदाही राज्यभरातील दर्जेदार साहित्यिकांची या पुरस्कारांसाठी निवड केली आहे. या सोहळ्याला पंढरपूर परिसरातील सर्व रसिक, वाचक आणि साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन परिमल सांस्कृतिक व्यासपीठ चे अध्यक्ष सचिन कुलकर्णी व संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !