नांदगाव पोलिसांची 'आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी' भूमिका!
शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे )
सातारा जिल्हाचे पोलीस अधिक्षक म्हणुन पिंगळे यांनी पदभार स्विकारल्यानंतर सातारासह कराडमध्ये कामाचा धडाका चालु केला आहे. अवैध व्यवसाय व व्यवसायिकाची पोळेमुळे ओळखुन मुळावर घाव घालत बहुतांश अवैध व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. तर सातारा जिल्हातील शहर व परिसरातीत अवैध धंदावर कारवाईचा धडाका सुरु असल्यामुळे अवैध व्यवसायिकाचे समुह उच्चाटन झाल्याचे दिसुन येत आहे, तर दुसरीकडे जिल्हातील कराड दक्षिणच्या ग्रामीण भागात नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असण्या-या अधिकारा-याच्या अधिकार क्षेत्रात मात्र कायदा सुव्यवस्थेचा सुकाळ असल्याने उघड-उघड रस्त्यालगत 'हिरव्या शेडनेड'च्या आडुन अवैध व बनावट दारुविक्री सुरु असुनही नांदगाव पोलिसांची 'कार्यतत्परता दिसुन येत नसल्याने "आग रामेश्र्वरी, बंब सोमेश्वरी" परिस्थिती दिसुन येत आहे.
नवा गडी नवे राज्य या उक्तीप्रमाणे नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये रुजु झालेल्या कार्यतत्पर पोलीस अधिकारी, कर्मचारी अवैध दारुविक्री, गांजा विक्री, गुटखा विक्री, व अवैध वाहतुकीवर कारवाई करण्यात 'सपशेल अपयशी' ठरतायहेत का..? या चालु असणाऱ्या अवैध धंदाकडे' जाणिवपूर्वक' दुर्लक्ष करत वरिष्ठांना 'आँल ईज वेल'ची भाषा करत दिशाभूल करत आहेत का..? असा प्रश्न स्थानिकामधुन उपस्थित होत आहे.
नांदगाव पोलीस स्टेशनच्या हद्दिमध्ये येणाऱ्या या अवैध धंदे व अवैध व्यवसायातुन 'गब्बर' झालेल्या व्यवसायिकाच्या विरोधात समाज माध्यमातून वेळोवेळी "प्रश्न" उपस्थित होवुन ही, पाचवड फाटा, कालेटेक व ओंड हद्दितील ढाबा वजा "ओपन विना परवाना" बार सारखी परिस्थिती असुनही नांदगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत 'कार्यतत्पर' अधिकारी, कर्मचारी नक्की काय करत आहेत हे ही वरिष्ठ विभागाकडुन शोध घेण्याची मागणी परिसरातुन होवु लागली आहे.
या परिसरातील होत असलेल्या बहुतांश अवैध व्यवसायाना कोण 'खत-पाणी' घालण्याचा प्रयत्न करत आहेत? याचा वेळीच शोध घेवुन वर्षानुवर्षे बोथट झालेल्यांची अवस्था 'निदान' वरिष्ठ विभागाकडुन स्पष्ट होईल काय..? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कायदा व सुव्यवस्था आहे का...? हा प्रश्न निर्माण होतो कारण रस्तालगत जागोजागी उघड्यावर दारुविक्री या धंदाना पुरवण्यात येणारा दारुसाठा व वाहतुक कोणाच्या संगनमताने सूरु आहे हे सर्वश्रुत असुन अवैध वडाप, गांजाविक्री हे दक्षिणच्या याच 'प्रतिभाशिल' हद्दिमध्ये राजरोसपणे होताना दिसुन येत आहे.
आपल्या कामाच्या कार्यपध्दतीने अल्पावधीत वाहवा मिळवुन कायदा सुव्यवस्था निर्माण करण्यास आरंभ केलेले सातारा जिल्ह्यातील एसपी साहेब कराड दक्षिणेतील एका औट पोस्ट अंतर्गत सुरु असणाऱ्या अवैध व्यवसायास व या व्यवसायिकांना पाठिशी घालणा-या कायद्याच्या 'चाकोरी'त आणण्यात किती यशस्वी ठरताहेत हेच पाहणे औचित्याचे ठरुन, राजरोस सुरु असणाऱ्या अवैध दारुविक्री, वाहतुकीवर 'भारदस्त'कारवाई करण्यासाठी दक्षिणेतील सर्वसामान्य साद घालु लागल्याचे दिसुन येत आहेत.
दरम्यान, कराड-चांदोली मार्गावरील याच औट पोस्टच्या अंतर्गत येणाऱ्या गावांच्या हद्दीमध्ये रस्त्यालगत असणाऱ्या शेड व जिर्ण ढाबा भोवती हिरव्या शेडनेट,आड कोणता व्यवसाय 'राजरोस' सुरु आहे हे सर्वश्रुत असुन कागदोपत्री कारवाई करुनही त्याच्या दुस-या दिवशी, कारवाईची भरपाई करण्यासाठी 'सकाळी ६ वाजल्यापासून दुचाकीच्या रांगा कशासाठी दिसुन येतात..! असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा![]()



