वाई तालुक्यातील आसरे गावचे सुपुत्र अमोल सणस यांना 'महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार २०२६' प्रदान!

पुण्यातील भव्य सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते गौरव; वाई-कोरेगाव तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव

Maharashtra Samajbhushan Award 2026, Satara, wai, shivshahi news .

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

सामाजिक, औद्योगिक व विकासात्मक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत वाई तालुक्यातील आसरे गावचे सुपुत्र, भारतीय जनता पक्ष उद्योग आघाडीचे सहसंयोजक तथा समाजसेवक अमोल सणस यांना या वर्षीचा प्रतिष्ठेचा "महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार २०२६" प्रदान करून गौरविण्यात आले. पुणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या एका भव्य आणि दिमाखदार सोहळ्यात त्यांना हा सन्मान बहाल करण्यात आला.

     या सोहळ्याला पुणे महानगरपालिकेच्या माजी सभागृह नेत्या स्वरदाताई बापट, उद्योजक अशोकराव पळंडे, 'आयएमआरपी इंडिया'चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. राम यादव, मराठा क्रांती मोर्चाचे नेते राहुल लोहार पवार तसेच आम आदमी पार्टी युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविराज काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

     अमोल सणस यांनी वाई आणि कोरेगाव तालुक्यात सामाजिक व जनहिताच्या कामांमध्ये सातत्याने मोलाचे योगदान दिले आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या सुख-दुःखात धावून जाणे, विविध सामाजिक उपक्रम राबवणे, गरजू नागरिकांना वेळेवर मदत करणे, आणि युवकांना नवनवीन संधी उपलब्ध करून देणे यांमुळे त्यांनी जनमानसात एक विश्वासार्ह आणि संवेदनशील युवा नेतृत्व म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या याच समाजाभिमुख कार्याची दखल घेऊन त्यांना या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

     यावेळी स्वरदाताई बापट (माजी सभागृह नेत्या, पुणे महानगरपालिका) म्हणाल्या की, "अमोल सणस हे सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने जनतेसाठी कार्य करणारे ऊर्जावान युवा नेतृत्व आहे. वाई आणि कोरेगाव तालुक्यात त्यांनी विकासकामे, सामाजिक उपक्रम आणि जनहिताच्या प्रश्नांसाठी केलेले योगदान खरोखरच उल्लेखनीय आहे. त्यांच्या कार्याचा गौरव 'महाराष्ट्र समाजभूषण पुरस्काराने' होणे ही त्यांच्या कर्तृत्वाची योग्य पावती आहे. भविष्यातही ते समाजसेवेत अशीच भरीव कामगिरी करतील, असा विश्वास वाटतो."

     केवळ समाजकारणच नव्हे, तर उद्योग क्षेत्रातही अमोल सणस यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. उद्योजकता, रोजगारनिर्मिती आणि व्यावसायिक यश मिळवत असतानाच त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी कधीही सुटू दिली नाही. या दोन्ही क्षेत्रांतील त्यांच्या समतोल आणि प्रभावी कामगिरीमुळेच आज त्यांची राज्यस्तरावर एक स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.

     पुरस्काराला उत्तर देताना अमोल सणस भावूक झाले, ते म्हणाले, "हा पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. समाजहित आणि विकासाच्या कामांसाठी यापुढेही अधिक जोमाने आणि प्रामाणिकपणे कार्य करत राहण्याची ऊर्जा मला यातून मिळाली आहे. हा सन्मान माझ्या खांद्यावर अधिक मोठी सामाजिक जबाबदारी टाकणारा आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे."

     दरम्यान, अमोल सणस यांना हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या आसरे गावासह संपूर्ण वाई व कोरेगाव तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय कार्यकर्ते आणि नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !