शाळा म्हणजे जीवन शिक्षणाचे मंदिर

शाळेमध्ये भौतिक सुविधांपेक्षा गुणवत्तापूर्ण शिक्षण महत्वाचे - जिल्हाधिकारी संतोष पाटील

Priority is given to quality education over physical amenities, Satara, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

शाळा या जीवन शिक्षण देणारी मंदिर असल्यामुळे शाळेतील भौतिक सुविधांपेक्षा गुणवत्तापूर्ण शिक्षण महत्वाचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.

प्रतापसिंह हायस्कूल येथे आज वागत विद्यार्थ्यांचे स्वागत व प्रवेशोत्सव २०२६ कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील बोलत होते. नगर सेविका भारती शिंदे, किरण पाटील, शाळेचे मुख्याधपक व शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

     जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, आज प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी नक्कीच काही विद्यार्थी देश पातळीवर शाळेचे नाव उज्ज्वल करतील. प्रतापसिंह हायस्कुलला मोठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेचे नाव देश पातळीवर उंचावले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखे प्रकांड पंडित या शाळेने घडविले आहेत. 

तसेच मुंबई प्रांताचे माजी मुख्यमंत्री धनजीशा कूपर, यांच्यासह अनेक उद्योजक, कृषितज्ज्ञ नेते या शाळेने घडविले आहेत. शाळेचे नाव उज्ज्वल करणे ही विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे. आज उपस्थित असलेल्या काही विद्यार्थ्यांनी भविष्यात आय. ए. एस. व्हावे आणि असाच कार्यक्रम घ्यावा अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. तसेच शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्यावे आणि देश पातळीवर शाळेचे नाव उंचवावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.

यावेळी दोन विद्यार्थिनी आणि एका विद्यार्थ्याने उत्स्फूर्त भाषण केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !