पंढरीत साहित्यिकांचा महाकुंभ! परिमल सांस्कृतिक व्यासपीठच्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांचे दिमाखात वितरण

राज्यभरातील ३१ साहित्यिकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव
Parimal sanskrutik vyaspith, sahitya puraskar, Parimal Literature Award, pandharpur, Solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
ग्रामीण भागातील साहित्य चळवळ जिवंत ठेवण्यासाठी आणि लिहिणाऱ्या हातांना बळ देण्यासाठी परिमल सांस्कृतिक व्यासपीठ (रोपळे बुद्रुक, ता. पंढरपूर) च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांचे श्रीक्षेत्र पंढरी नगरीमध्ये अत्यंत दिमाखदार सोहळ्यात वितरण करण्यात आले. या सोहळ्यात राज्यभरातील ३१ नामवंत साहित्यिकांना विविध श्रेणींतील मानाचे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव तथा मराठी भाषा दक्षता अधिकारी प्रा. डॉ. शिवाजी शिंदे हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मराठी साहित्य परिषदेचे पंढरपूर शाखा अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते प्रणव परिचारक, आदर्श माता पुष्पलता निकम आणि परिमल सांस्कृतिक व्यासपीठाचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

साहित्य चळवळ जिवंत राहणे ही काळाची गरज: प्रा. डॉ. शिवाजी शिंदे
अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. शिवाजी शिंदे यांनी परिमल संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, "असे कौतुकास्पद कार्यक्रम लिहिणाऱ्या हातांचे बळ वाढवतात. विशेष म्हणजे ग्रामीण भागात कार्यरत असूनही परिमल सांस्कृतिक व्यासपीठाने राज्यभरातील साहित्यिकांचा शोध घेऊन त्यांना गौरविले आहे, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. संस्थेचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी अतिशय तळमळीने ही साहित्य सेवा करत असून, त्यांच्या अशा प्रयत्नांमुळेच आज साहित्य चळवळ जिवंत आहे."

प्रास्ताविक आणि स्वागत
कार्यक्रमाच्या सुरुवातीला परिमल सांस्कृतिक व्यासपीठाचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. त्यांनी संस्थेच्या आजवरच्या वाटचालीचा आणि पुरस्कार निवडीमागचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर मान्यवरांचे स्वागतपर सत्कार करण्यात आले. उद्घाटक सिद्धार्थ ढवळे, प्रणव परिचारक आणि पुष्पलता निकम यांनीही आपल्या मनोगतातून पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना शुभेच्छा दिल्या.

पुरस्कारप्राप्त साहित्यिक

या सोहळ्यात एकूण ३१ साहित्यिकांना ५ मुख्य श्रेणींमध्ये आणि जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिकांना त्यांच्या आयुष्यभरच्या अमूल्य साहित्य सेवेसाठी हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला.

जीवन परिमल राज्यस्तरीय पुरस्कार (जीवनगौरव)
प्रा. भास्कर बंगाळे (पंढरपूर)
प्रा. शिवाजीराव बागल (पंढरपूर)
जीवन पाटील (पंढरपूर)
प्रा. किसनराव कुराडे पाटील (कोल्हापूर)


काव्य परिमल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार
मारुती कटकधोंड (सोलापूर) – पुस्तक: 'डोहतळ'
रावसाहेब साठे (जत) – पुस्तक: 'चुकारीची फुलं'
बबन धुमाळ (दौंड) – पुस्तक: 'नवा मोहर गळतो'
वासंती वैद्य (पुणे) – पुस्तक: 'आवर्त'
हेमंत रत्नपारखी (मंगळवेढा) – पुस्तक: 'हा खेळ नव्हे शब्दांचा'

कथा परिमल राज्यस्तरीय पुरस्कार
राजेंद्र भोसले (सोलापूर) – पुस्तक: 'परतीचा प्रवास'
मधुकर फरांडे (हातकणंगले) – पुस्तक: 'कोंडी'
अनिता जाधव (नांदेड) – पुस्तक: 'तांड्याचे पाय'
डॉ. मारुती नलावडे (ठाणे) – पुस्तक: 'अहो खरंच 480 टक्के'
डॉ. अनंत कडेठाणकर (छत्रपती संभाजीनगर) – पुस्तक: 'लाईफ जॅकेट'


साहित्य परिमल राज्यस्तरीय पुरस्कार
ना. तु. पोघे (छत्रपती संभाजीनगर) – पुस्तक: 'इरवाड'
सुनील देसाई (भुदरगड) – पुस्तक: 'सप्तपर्व'
सुजितकुमार कांबळे (मंगळवेढा) – पुस्तक: 'यशबळी'
प्रा. शिवाजीराव वाघमारे (पंढरपूर) – पुस्तक: 'जडणघडण'
दिनेश फडतरे (पुणे) – पुस्तक: 'रँडम'


उदय परिमल राज्यस्तरीय पुरस्कार
ह.भ.प. सूर्याजी भोसले (पंढरपूर) – पुस्तक: 'कालाभूल'
प्रा. नागेश सिंघण (पंढरपूर) – पुस्तक: 'भाग्यविधाता'
संतोष मंजुळे (करमाळा) – पुस्तक: 'पार्वती'
गंधार कुलकर्णी (अमरावती) – पुस्तक: 'पद्यस्पर्श'
संतोष रायबान (मंगळवेढा) – पुस्तक: 'ओल काळजाची'
मारुती वाघ (पुसेगाव) – पुस्तक: 'कर्मचक्र'


सेवा परिमल पुरस्कार
प्रकाश जडे (मंगळवेढा)
प्रा. शशिकांत जाधव (मंगळवेढा)
डॉ. विजयकुमार देशमुख (मुंबई)
प्रा. दादासाहेब खरात (पंढरपूर)
वंदना कुलकर्णी (सोलापूर)
भारत सातपुते (लातूर)



सोहळ्याची सांगता

या संपूर्ण सोहळ्याचे नेटके आणि बहारदार सूत्रसंचालन ॲड. उमाकांत आदमाने यांनी केले, तर उपस्थितांचे आभार जागतिक विक्रमवीर कवी रवी वसंत सोनार यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार तानाजी जाधव, विकास वळणे, मनीषा कुलकर्णी, प्रीती कुलकर्णी, मुरली शेटे यांच्यासह परिमल सांस्कृतिक व्यासपीठाचे सर्व पदाधिकारी आणि मित्रपरिवाराने विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्याला पंढरपूर व परिसरातील रसिक नागरिक आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !