जिल्हा परिषदमध्ये शिवसेना,राष्ट्रवादीच्या नेत्यांची झालेली ’फरफट’ कार्यकर्त्यांच्या जिव्हारी;दगा फटका होण्याची कदमांना भीती?
शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
सातारा–सांगली जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात 'सत्ता असूनही भाजपाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत जिंकण्यासाठी धावपळ' करावी लागत आहे.सत्तेची समीकरणे टिकवून सातारा सांगलीवर आपले वर्चस्व राखण्यासाठी भाजप धडपड करत आहे.विरोधक असलेल्या राष्ट्रवादी(शरद पवार) गटाच्या आक्रमकतेमुळे प्रचार करताना भाजपचा ’घामटा’ निघाला आहे.
भाजपबरोबर शिवसेना(शिंदे गट) आणि राष्ट्रवादी(अजित पवार गट) महायुती म्हणून सत्तेत असूनही सातारा जिल्हा परिषदमध्ये झालेल्या सत्ता स्थापने दरम्यान शिवसेना,राष्ट्रवादी नेत्यांची झालेली ’फरफट’ कार्यकर्त्यांच्या अक्षरशः जिव्हारी लागला आहे. या तिन्ही पक्षातील अंतर्गत वादामुळे स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये दगा फटका तर होणार नाही ना? याची भीती धैर्यशील कदम यांना लागून राहिली आहे. त्यामुळे भाजप पक्षाला विजयासाठी विशेष रणनीती आणि धावपळ करावी लागत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
अपमानाचा वचपा अन् मतांसाठी धैर्यशील कदमांची धावपळ
सातारा जिल्हा परिषदमध्ये महायुतीत वाद झाला असला तरी विधान परिषदेच्या निवडणुकीत सर्व अलबेल असल्याचे चित्र भाजपकडून रंगवले जात आहे.
परंतु स्थानिक पातळीवरील शिवसेना, राष्ट्रवादीचे मतदार आपल्या नेत्यांचा झालेला अपमानाचा वचपा काढण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.त्याच भीतीने धैर्यशील कदम सतत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांची भेटीगाठी घेण्यासाठी धावपळ करत आहेत.
जनसंपर्क आणि मेळावे.
शिवसेना,राष्ट्रवादी पक्षांमधील मतदारांची नाराजी दूर करण्यासाठी आणि विरोधकांचे आक्रमण निष्प्रभ करण्यासाठी भाजप पक्षातील प्रमुख नेते सातारा सांगलीचे दौरे करत मेळावे घेत आहेत. सत्तेचा पुरेपूर वापर करून विजयाची गणिते जुळवण्यासाठीचा हा प्रयत्न होताना दिसून येत आहे.
विरोधी पक्षांची रणनीती.
मतांची बेरीज कमी असतानाही तसेच सत्तेत नसतानाही विरोधक असलेल्या राष्ट्रवादी (शरद पवार गट),शिवसेना(उद्धव ठाकरे गट) आणि काँग्रेसने सत्ताधाऱ्यांच्या अंतर्गत वादावर,भ्रष्टाचारावर आणि अपयशावर बोट ठेवून सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये वातावरण निर्मिती केली आहे.यामुळे भाजपला बचाव करण्यासाठी आणि महायुती मधील एकमत पुन्हा आपल्या बाजूने वळवण्यासाठी अधिक वेगाने प्रयत्न करावे लागणार आहेत.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा![]()



