स्व. वेणूताई चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त जन्मशताब्दी विशेषांकाचे प्रकाशन

कराडमध्ये विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन सभा संपन्न

Greeting meeting concluded, Satara, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे )

श्री शिवाजी शिक्षण संस्था उच्च शिक्षण मंडळ कराडचे वेणूताई चव्हाण कॉलेज, यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स आणि सौ. वेणूताई चव्हाण स्मारक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट कराड यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मान्यवरांच्या शुभहस्ते 'स्व. सौ. वेणूताई चव्हाण जन्मशताब्दी विशेषांकाचे' दिमाखदार प्रकाशन करण्यात आले.

     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री, तसेच श्री. शिवाजी शिक्षण संस्था व उच्च शिक्षण मंडळ कराडचे चेअरमन बाळासाहेब पाटील हे होते. तर महात्मा फुले शिक्षण संस्था ऊरुण ईश्वरपूरच्या जनरल सेक्रेटरी श्रीमती सरोज नारायण पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

     कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय सौ. वेणूताई चव्हाण यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते भावपूर्ण पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी वेणूताईंच्या स्मृतींना उजाळा दिला. अध्यक्षीय भाषणात बोलताना बाळासाहेब पाटील यांनी वेणूताईंच्या सामाजिक योगदानाचा आणि त्यांच्या जीवनप्रवासाचा गौरव केला.

     याप्रसंगी श्री शिवाजी शिक्षण संस्था उच्च शिक्षण मंडळाचे जनरल सेक्रेटरी अल्ताफहुसेन मुल्ला, संस्थेचे विश्वस्त व सदस्य अरुण पांडुरंग पाटील व प्रकाश पाटील, लोकशाही आघाडी कराडचे अध्यक्ष व नगरसेवक जयंतकाका पाटील, संजय बदियानी, नंदकुमार बटाने, भास्करराव कुलकर्णी, दादासो सुतार, अशोक पोतदार, आर. जी. तांबे, माजी प्राचार्य बी. एन. कालेकर, एस. बी. केंगार तसेच कराडमधील अनेक ज्येष्ठ मान्यवर आणि शिक्षण क्षेत्रातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.

     कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन वेणूताई चव्हाण कॉलेजचे प्राचार्य आर. आर. जाधव व यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्सचे प्राचार्य एस. एच. बुरुंगले यांनी केले. याप्रसंगी प्रा. रैनाक, प्रा. कराळे यांच्यासह दोन्ही महाविद्यालयांतील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !