नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या संकल्पनेतून २७ जूनला ‘भव्य रोजगार मेळावा
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे )
सातारा जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी वाई नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अनिल लक्ष्मण सावंत यांच्या संकल्पनेतून येत्या शनिवार, दिनांक २७ जून २०२६ रोजी सकाळी ९:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत गणपती मंदिरासमोर, वाई येथे एका ‘भव्य रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात नामांकित राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्या, नामांकित बँका आणि वित्तीय संस्था थेट मुलाखतींद्वारे ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भरती करणार आहेत.
या रोजगार मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व स्तरांतील सुशिक्षित तरुणांसाठी यात संधी उपलब्ध आहे. ५ वी पास ते पदव्युत्तर, आय.टी.आय., डिप्लोमा आणि इंजिनिअर शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार या मेळाव्यात सहभागी होऊ शकतात. विविध क्षेत्रांतील खाजगी आस्थापनांमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे या माध्यमातून भरली जाणार आहेत.
या रोजगार मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी त्वरित आपली नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. वर दिलेला अधिकृत QR कोड स्कॅन करून उमेदवारांना आपली नोंदणी करता येईल. तरी सातारा जिल्ह्यातील आणि विशेषतः वाई परिसरातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी आपल्या आवश्यक कागदपत्रांसह या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



