प्रधानमंत्री आवास योजना व इतर घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना घरबांधणीसाठी मोफत वाळू मिळणार - तहसीलदार अजित दिवटे

पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
Free sand for gharkul, pradhanmantri aawas Yojana, tahsildar Ajit divate, sindkhedraja, buldhana, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
प्रधानमंत्री आवास योजना व इतर घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना घरबांधणीसाठी आवश्यक असलेली रेती मोफत उपलब्ध करून देण्यात येत असून, येत्या ९ तारखेपर्यंत पात्र लाभार्थ्यांनी रेतीच लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार अजित दिवटे यांनी केले आहे.

तहसील प्रशासनाच्या वतीने घरकुल लाभार्थ्यांसाठी रेती वितरणाची विशेष व्यवस्थ करण्यात आली आहे. लाभार्थ्यांची ऑनलाइन माहिती तहसील कार्यालयात उपलब्ध असून लाभार्थ्याने आपले नाव व आवश्यक माहिती दिल्यानंतर तत्काळ रेतीसाठी नोंदणी व बुकिंगची प्रक्रिया करण्यात येत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट प्रशासनाशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा असेही तहसीलदार दिवटे यांनी सांगितले. रेती वितरणासंदर्भात अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी संबंधित लाभार्थ्यांनी आपल्या मंडळ कार्यालयाशी संपर्क साधावा. 

यामध्ये सिंदखेडराजा, मलकापूर पांगरा, दुसरबीड, साखरखेर्डा शेंदुरजन, सोनोशी आणि किनगाव राजा या मंडळ कार्यालयांच समावेश आहे. तसेच तहसील कार्यालयातील विशेष कक्षात विकी जगताप, प्रदीप मोरे, महंमव चौधरी, तुषार मरगड, रामेश्वर हिरे आणि गणेश देशमुख यांच्याशी संपर्क साधून लाभार्थी रेती घेऊ शकतात तहसील प्रशासनाने घरकुल लाभार्थ्यांन वेळेत घरबांधणी पूर्ण करता यावी आणि बांधकाम साहित्याच्या वाढत्या खर्चामुळे त्यांच्यावर आर्थिक भार पडू नये, या उद्देशाने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी विलंब न करता येत्या ९ तारखेपूर्वी मोफत रेतीचा लाभघ्यावा, असे आवाहन तहसीलदार अजित दिव यांनी केले आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !