अनिता जाधव यांच्या 'तांड्याचे पाय' कथासंग्रहाला परिमल सांस्कृतिक व्यासपीठाचा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार

पंढरी नगरीमध्ये मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

Anita jadhav, Parimal Sanskrutik vyaspith, sahitya puraskar, nanded, pandharpur, Solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
परिमल सांस्कृतिक व्यासपीठ (रोपळे बु., ता. पंढरपूर) च्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला.
हॉटेल राधाकृष्णकराड रोड, पंढरपूर येथे आयोजित या सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या ३१ गुणवंत साहित्यिकांना त्यांच्या उत्कृष्ट साहित्यकृतींसाठी वेगवेगळ्या श्रेणीत राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये नांदेड येथील लेखिका अनिता जाधव यांच्या 'तांड्याचे पाय' या कथासंग्रहाला 'कथा परिमल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार' प्रदान करण्यात आला.
या सोहळ्याच्या मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे, मराठी साहित्य परिषद (पंढरपूर शाखा) चे अध्यक्ष सिद्धार्थ ढवळे, युवा नेते प्रणव परिचारक, तसेच आदर्श माता पुष्पलता निकम आणि परिमल सांस्कृतिक व्यासपीठाचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते अनिता जाधव यांना सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत करताना परिमलचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी संस्थेच्या साहित्यिक व सांस्कृतिक प्रवासाचा आढावा घेतला. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात पुरस्कारप्राप्त साहित्यिकांच्या लेखनाचा गौरव करत, अशा पुरस्कारांमुळे दर्जेदार साहित्याला व नव्या लेखकांना मोठी प्रेरणा मिळते, असा विश्वास व्यक्त केला. या सोहळ्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले साहित्यिक, रसिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !