नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या अधिकृत बोधचिन्हाचे दिमाखदार अनावरण

पुण्याच्या सुमित काटे यांच्या संकल्पनेला प्रथम क्रमांक - मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मान्यवरांचा गौरव

"नाशिक कुंभमेळा हा केवळ धार्मिक उत्सव नसून तो भारताच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवणारा सोहळा आहे. आज अनावरण झालेले बोधचिन्ह या सोहळ्याची जागतिक ओळख बनेल."

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Nashik Trimbakeshwar Kumbh Mela, logon inauguration, CM Devendra fadnavis, DCM Eknath Shinde, Sunetra pawar, shivshahi news, Maharashtra,

शिवशाही वृत्तसेवा, मुंबई (विशेष प्रतिनिधी)

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या पावन भूमीत २०२७ मध्ये रंगणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची जय्यत तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. या जागतिक सोहळ्याची ओळख ठरणाऱ्या अधिकृत 'बोधचिन्हा'चे (लोगो) आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते उत्साहात अनावरण करण्यात आले.

देशभरातून ३००० हून अधिक प्रवेशिका

कुंभमेळा प्राधिकरणाने 'मायगव्ह' आणि 'असोसिएशन ऑफ डिझाइनर्स ऑफ इंडिया' यांच्या सहकार्याने या लोगोसाठी देशव्यापी स्पर्धा आयोजित केली होती. २० नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत ७० आंतरराष्ट्रीय स्पर्धकांसह एकूण ३,०६७ प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. यामध्ये महाराष्ट्र राज्य सहभागात आघाडीवर राहिले, तर तरुण पिढीचा (१८ ते २४ वयोगट) सहभाग लक्षणीय होता.

विजेत्यांचा गौरव आणि बक्षिसांची लुट

दिग्गज डिझाइन तज्ज्ञांच्या समितीने सर्जनशीलता आणि धार्मिक वारसा या निकषांवर विजेत्यांची निवड केली.

प्रथम क्रमांक: सुमित काटे (पुणे) – ३ लाख रुपये व सन्मानचिन्ह.

द्वितीय क्रमांक: मयांक नायक (नोएडा) – २ लाख रुपये व सन्मानचिन्ह.

तृतीय क्रमांक: पीयुष पिंपळनेरकर (पंढरपूर) – १ लाख रुपये व सन्मानचिन्ह.

यावेळी परीक्षक समितीतील प्रसून जोशी, अश्विनी देशपांडे, मंदार राणे यांच्यासह अन्य तज्ज्ञांचाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

बोधचिन्हाचे आध्यात्मिक महत्त्व व वैशिष्ट्ये

हे बोधचिन्ह केवळ एक चित्र नसून नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या परंपरेचे प्रतिबिंब आहे:

भगवान शंकराचे त्रिशूळ: हे आध्यात्मिक ऊर्जेचे प्रतीक म्हणून मध्यभागी दर्शवले आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिर: प्रादेशिक वारसा आणि श्रद्धास्थान म्हणून मंदिराची प्रतिकृती यात गुंफली आहे.

काळाराम मंदिर कमान व गोदावरी: गोदावरी नदीला 'शिवलिंगा'च्या रूपात साकारण्यात आले असून, ते कुंभमेळ्यातील शाही स्नानाचे महत्त्व अधोरेखित करते.

मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्याला कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, छगन भुजबळ, दादाजी भुसे, उदय सामंत, शिवेंद्रसिंह राजे भोसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम आणि कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विविध आखाड्यांच्या साधू-संतांचे स्वागत करण्यात आले. आयुक्त शेखर सिंह यांनी प्रास्ताविकात कुंभमेळ्याच्या नियोजित आराखड्याची माहिती दिली.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !