वाईच्या पश्चिम भागातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
विकासाची नवी समीकरणे आणि महायुतीचा नवा धडाका पाहायला मिळत असताना वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव शेठ सणस यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
ज्ञानदेव शेठ सणस हे पश्चिम भागातील उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रातील सक्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात त्यांचा पश्चिम भागामध्ये दंडगा जनसंपर्क असल्याने . त्यांच्या प्रवेशामुळे वाई तालुक्यातील शिवसेनेची ताकद वाढणार असून आगामी स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः पश्चिम भागात त्यांचा मोठा जनसंपर्क आणि युवकांमध्ये प्रभाव असल्याने शिवसेनेला संघटनात्मक बळ मिळणार असल्याचे मानले जात आहे.
यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी ज्ञानदेव शेठ सणस यांच्या निर्णयाचे स्वागत केले. विकासाभिमुख राजकारण आणि जनतेच्या प्रश्नांसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
ज्ञानदेव शेठ सणस यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे वाई तालुक्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




