वारकरी संप्रदायातील निष्ठावंत काळाच्या पडद्याआड; 'पांडुरंगाच्या चरणी विसावला विठ्ठल

नावेची वाडीत पसरली शोककळा 

Vitthal gade passes away, Wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई प्र(तिनिधी शुभम कोदे) 

नावेची वाडी, वाई (ता. वाई) येथील रहिवासी आणि पत्रकार  प्रविण गाडे यांचे वडील कै.विठ्ठल अंतू गाडे (वय ७३) यांचे शनिवार, दि. २ मे रोजी रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून एका सात्विक आणि परोपकारी व्यक्तिमत्वाला समाज मुकला आहे. 

विठ्ठल गाडे यांनी आपले संपूर्ण आयुष्य अत्यंत साधेपणाने आणि परोपकारात व्यतीत केले. कोणाशीही वाद किंवा मतभेद न ठेवता, सर्वांशी मिळून-मिसळून वागण्याचा त्यांचा स्वभाव होता. आपल्या वडिलांप्रमाणेच त्यांनी वारकरी संप्रदायाची कास धरली होती. पांडुरंगावरील अढळ श्रद्धा आणि भजन-कीर्तनाची आवड त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होती. 

व्यवसायाने गवंडी असलेल्या विठ्ठल गाडे यांनी अत्यंत कष्टाने आणि प्रामाणिकपणे अनेकांची स्वप्नातील घरे बांधून पूर्ण केली. मात्र, दुर्दैवाने स्वतःच्या घराचे काम सुरू असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली. स्वतःचे घर अर्ध्यावर सोडून ते अनंतात विलीन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे.

रविवार, दि. ३ मे रोजी सकाळी वाई येथील रविवार पेठ स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, दोन विवाहित मुली आणि सहा नातवंडे असा मोठा परिवार आहे.

स्व. विठ्ठल गाडे यांचा सावडण्याचा विधी सोमवार, दिनांक ४ मे २०२६ रोजी सकाळी ८:३० वाजता रविवार पेठ, वाई येथील स्मशानभूमीत होणार असल्याची माहिती गाडे परिवाराच्या वतीने देण्यात आली आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !