पश्चिम भागाचा विकास नेमका कधी होणार?

धरण दिल बलिदान दिल पण पश्चिम भाग आजही विकासापासून कोसो दूर 

The western part is far from development, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

वाई तालुक्याच्या पश्चिम भागाला निसर्गाने भरभरून सौंदर्य दिले. डोंगर-दऱ्या, ऐतिहासिक गड-किल्ले, धोम बलकवडी धरण व जाभळी बंधारा धरणाचे विहंगम दृश्य, वारकरी संप्रदायाची परंपरा, पर्यटनासाठी पोषक वातावरण आणि माणुसकी जपणारी जनता  एवढं सगळं असूनही हा भाग आजही मूलभूत सुविधांसाठी झगडताना दिसत आहे.

निवडणुका येतात घोषणा होतात विविध पक्षांचे झेंडे खांद्यावर घेतले जातात पण निवडणुका संपल्या की पश्चिम भाग पुन्हा अंधारातच जातो, अशी संतप्त भावना आता जनतेतून व्यक्त होत आहे.

धोम धरणासाठी या भागातील अनेक गावांनी बलिदान दिले. अनेकांची घरं पाण्याखाली गेली, अनेक गावं विस्थापित झाली, पिढ्यानपिढ्यांच्या आठवणी धरणात बुडाल्या. १९७२ मध्ये उभारण्यात आलेल्या धोम धरणामुळे पूर्व भागातील शेती सुजलाम सुफलाम झाली. खंडाळा, फलटण, बारामती, कोरेगाव, भोर आणि सातारा जिल्हा पर्यंत व अनेक तालुक्यांपर्यंत पाणी पोहोचले. मात्र ज्यांनी धरणासाठी सर्वस्व दिलं त्या कोंढावळे, वासोळे, वाशिवली भिवडी, आकोशी, जांभळी, वडवली, खावली ते आसरेपर्यंतच्या पश्चिम भागाला आजही पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. या सर्व गावचे क्षेत्र ओलिताखाली आलेले नाही  ही फार मोठी शोकांतिका आहे हे क्षेत्र ओलिताखाली आलं असतं तर लोकांना मुंबई पुण्याचा रस्ता धरायला लागला नसता 75 ते 80 टक्के लोकांचे पुनर्वसन झालं परंतु  धक्कादायक बाब म्हणजे अनेक शेतकऱ्यांचे पुनर्वसन सुद्धा झालेलं नाही अनेक जण पुनर्वसन विभागाच्या दारामध्ये हेलपाटे मारत आहेत मग तो आसरे रेनावळे येथील बोगदा असेल यांच्या पुनर्वसनाच्या अनेक त्रुटी असतील  आणि त्यांचं पुनर्वसन झालं नाही पश्चिम भागातील धरणग्रस्त समितीने भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते भंडारी यांना मोठ्या  डामडोलात  रेनावळे येथे घेऊन आले होते परंतु पुनर्वसनाचा जटिल प्रश्न काही सुटला नाही या शेतकऱ्यांना पुनर्वसनासाठी अनेक राजकीय पुढाऱ्यांचे व पुनर्वसन विभागाच्या कार्यालयाचे दरवाजे आजही शेतकऱ्यांना धरणग्रस्तांना ठोठावे लागत आहे विशेष म्हणजे पुनर्विसन विभागाच्या अधिकाऱ्यांना आर्थिक रसात पुरवल्याशिवाय शेतकऱ्याचे धरणग्रस्ताचे काम मार्गी लावत नाहीत परंतु एखाद्या जमीन खरेदी करणाऱ्या एखाद्या एजंटचं  काम आलं की लगेच पुनर्वसन विभागातल्या फायली हलतात हे जवळजवळ 30 ते 35 वर्षापासून चालू आहे विशेष बाब म्हणजे या धरणग्रस्तांच्या कवडीमोल भावाने जमिनीसाठी पैसे भरलेले च्या पावत्या घेऊन त्यांचे खाते हे दलाल विकत घेतात व शासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत साठे लोटे करून त्या शेतकऱ्याची जमीन मिळवून त्या शेतकऱ्याची जमीन आपल्या नावावरती करून घेतात व त्या शेतकऱ्याला कवडीमोल किंमत देतात अशी परिस्थिती या पश्चिम भागामध्ये व धरणग्रस्तांची आहे परंतु कुठल्याही सरकारने आजपर्यंत याला वाचा फोडली नाही ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे ज्यांनी धरणासाठी बलिदान दिलं त्यांची ही अवस्था वास्तविक पाहता या शेतकऱ्याची व्यथा कोणीतरी जाणावी धरणग्रस्ताची व्यथा कोणीतरी जाणावी व  या पश्चिम भागाच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा मोठ्या प्रमाणात बोजवारा उडाल्याचे  दिसत असून या अतिदुर्गम डोंगरदऱ्यामध्ये वसलेल्या या भागात जर एखाद्याला सर्प दश सारखी जर   घटना घडल्यास किंवा एखाद्या जंगली प्राण्याने एखाद्या नागरिकावरती हल्ला केल्यास हा पश्चिम भाग डोंगरदऱ्यामध्ये वसलेला असल्याकारणाने या पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणात जंगली वनजन्य प्राण्यांचे अनेक गावांमध्ये ये जा चालू असते त्यामुळे तो  रुग्णालयात वाईपर्यंत पोहोचेपर्यंत जीव वाचेल याची खात्री नसते. धरणाच्या दोन्ही बाजूंना किमान अत्याधुनिक आरोग्य केंद्र आणि प्रत्येकी दोन्ही भागांना  एक ॲम्बुलन्स असावी, अशी मागणी वर्षानुवर्षे होत आहे. काही सेवाभावी संस्थांनी निवडणुकीच्या तोंडावर ॲम्बुलन्सची घोषणा केली; मात्र “ना गाड्या कधीही भागामध्ये कुठल्या रुग्णाला घेऊन जाताना  दिसल्या, ना सेवा” दिली  अशीच स्थिती पश्चिम भागामध्ये राहिली आहे हा पश्चिम भाग हा भक्ती शक्तीचा व सांप्रदायिक म्हणून ओळखला जातो वेलंग येथे तब्बल बारा कोटींचे आरोग्य केंद्र मंजूर असूनही जागेच्या प्रश्नावरून ते रखडल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. विविध जागा दाखवूनही शासकीय अधिकाऱ्यांनी त्रुटी काढल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. नामदार मकरंद पाटील यांनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आवर्जून हा मुद्दा उपलब्ध केला होता परंतु संबंधित विभागाच्या गलथान कारभारामुळे व वेलंग ग्रामस्थांनी लक्ष न दिल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचंही दबक्या आवाजात बोललं जात आहे वास्तविक पाहता पश्चिम भागाची  वारंवार खंडित होणारी वीजपुरवठा

डोंगरकपारीत वसलेल्या या भागात विद्युत वितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. जंगल परिसर, वन्यप्राण्यांचा वावर आणि दुर्गम भौगोलिक परिस्थिती असतानाही या भागासाठी स्वतंत्र आणि सक्षम यंत्रणा उभी करण्यात आलेली नाही.

एसटी सेवा ठप्प; विद्यार्थ्यांचे विद्यार्थिनींचे हाल

पश्चिम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी रोज वाई गाठावे लागते. मात्र एसटी महामंडळाच्या अनियमित कारभारामुळे अनेक विद्यार्थ्यांना रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचता येत नाही. जोर, गोळेवाडी, वाशिवली, कोंढावळे, वासोळे, घेराकेंजळ, माची, ओहळी, मडगणी, भिवडी, गोवे, आसगाव, आकोशी कोंढवली , परतवडी, बलकवडी, वायगाव, दह्याट अशा अनेक गावांतील विद्यार्थी विद्यार्थिनी  अक्षरशः जीव मुठीत धरून शिक्षण घेत आहेत. रात्री आठ आठ वाजेपर्यंत या विद्यार्थ्यांना एसटीची वाट पाहत एसटी स्टँड मध्ये बसावं लागत असतं  पर्यटनासाठी प्रचंड क्षमता; पण राजकीय इच्छाशक्तीचा अभाव पश्चिम भागात कमळगड, पांडवगड  केंजळगड  शिवछत्रपतींनी स्वराज्य स्थापनेची शपथ ज्या रोहिडेश्वर किल्ल्यावरती घेतली तो ऐतिहासिक किल्ला जरी भोर तालुक्यात असला तरी  या वाई तालुक्यातून अनेक भाविक भक्त धारकरी वारकरी या ऐतिहासिक किल्ल्यावरती वाई तालुक्यातूनच  जात असतात तसेच  ऐतिहासिक घाट, पांडवकालीन मंदिरे धोम्य ऋषींनी या ठिकाणी वास्तव्य केलं अनेक ऋषीमुनींनी या ठिकाणी वास्तव्य केलेला आहे  व याच ऐतिहासिक  धोम येथील प्राचीन मंदिर, त्या मंदिराकडे अनेक दशकापासून   कुठल्याही राजकीय पुढार्‍याने बघितलेलं नाही ऐतिहासिक ठेवा जपणं हे महत्त्वाचं असताना सुद्धा पुराणात काळातील मंदिरांच्याकडे राजकी पुढाऱ्यांचे लक्ष दिलेलं  नाही  मेणवलीचे ऐतिहासिक वाडे, जांभळी बंधारा आणि अनेक पर्यटन स्थळे पश्चिम भागामध्ये आहेत अनेक नामांकित  चित्रपटांचे चित्रीकरण याच पश्चिम भागामध्ये  झालेले आहे निसर्गरम्य परिसर आहेत. तापोळ्या सारख्या धरतीवरती जसे बोट क्लबचे परवाने स्थानिक भूमिपुत्रांना  शासनाने दिले आहेत त्याचप्रमाणे वाई येथील धोम व बलकवडी येथे तापोळा सारखी बोट क्लब ची निर्मिती करावी व पाटण सारख्या धरतीवरती जसा पर्यटन महोत्सव साजरा झाला तसाच पालकमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून या पश्चिम भागामध्ये , पर्यटन महोत्सव, साजरा करावा व  या सर्व बाबींमुळे   जलपर्यटन प्रकल्प या भागात सहज उभे राहू शकतात. काही राजकीय पुढार्‍यांनी भाकीत केले धोम धरणावर विमान उतरणार परंतु ते अनेक वर्ष झालं कागदावरतीच उतरत आहे   राजकीय नेत्याने व कुठल्याही पक्षाच्या राजकीय पुढार्‍याने  या पश्चिम भागाच्या पर्यटना साठी विकासाचा ठोस आराखडा मांडलेला नाही. विविध पक्षांचे झेंडे मिरवणारे युवक व कार्यकर्ते फक्त निवडणुकांपुरते सक्रिय होतात; मात्र पश्चिम भागाच्या प्रश्नांवर कोणीही रस्त्यावर उतरून आपले प्रश्न मांडत नसल्याची टिका आता सर्वसामान्य पश्चिम भागातील नागरिकांतून होत आहे. विशेषता वाई एमआयडीसी हाकेच्या अंतरावरती आहे परंतु या पश्चिम भागातील किती युवक या एमआयडीसीमध्ये काम करतात हाही प्रश्न महत्त्वाचा आहे वास्तविक पाहता या एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार व ठेकेदार ही आहेत त्यामुळे या युवकांना संधी मिळालेली नाही तसेच  वारकरी धारकरी  संप्रदायातही राजकारणाची घुसखोरी भक्ती, शक्ती वारकरी धारकरी  परंपरा आणि सांप्रदायिक ऐक्य जपणारा पश्चिम भाग आज राजकारणाच्या विळख्यात अडकताना दिसत आहे. तुकोबा, ज्ञानोबा, चोखोबांच्या विचारांनी चालणाऱ्या वारकरी संप्रदायातही आता राजकीय गटबाजी शिरल्याची खंत अनेक जण व्यक्त करत आहेत. “ह्याला गाढ… त्याला गाढ” या राजकारणात विकास हरवला गेल्या 40-45  वर्षांत या भागाने अनेक नेत्यांना मोठी पदं दिली. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती, उपसभापती अशी पदं मिळाली; पण पश्चिम भाग मात्र “जैसे थे”च राहिला. अनेक जिल्हा परिषदेची पद पंचायत समितीची पद भोगलेल्या नेत्यांनी परत त्या पश्चिम भागाकडे ढुंकून सुद्धा पाहिले नाही   पक्षीय वैर, व्यक्तिगत राजकारण आणि गावोगावची फूट यामध्ये विकासाचा मुद्दा हरवून गेला, अशी भावना आता सामान्य नागरिक बोलून दाखवत आहेत. आता तरी पश्चिम भागाला न्याय मिळणार का?

धरण दिलं… बलिदान दिलं… पर्यटन दिलं… संस्कृती दिली… पण बदल्यात पश्चिम भागाला काय मिळालं? असा संतप्त सवाल आता ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

या भागासाठी आरोग्य सुविधा, चांगले रस्ते, नियमित वीजपुरवठा, सक्षम एसटी सेवा, गावठाण प्रश्न, पर्यटन विकास, युवकांना रोजगार आणि बोट क्लब परवाने यांसारख्या मूलभूत मागण्या तातडीने मार्गी लावाव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

पश्चिम भागाला फक्त निवडणुकांपुरतं वापरण्यापेक्षा या भागासाठी लढणारा, विकासासाठी झटणारा आणि जनतेला न्याय देणारा खरा लोकनेता निर्माण व्हावा, अशी अपेक्षा आता पश्चिम भागातील सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.

      ----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !